पत्नी नेता तर पती चोर;
दरोड्याच्या पैशातून करायचा असं काम की, जाणून पोलीसही शॉक

belgavkar.com | belgaum | belgavkar

राजकारण आणि गुन्हेगारी जगताशी संबंधित असलेला हा कथित रॉबिनहूड

गुजरातच्या सुरतमध्ये चोरीच्या पैशातून गरिबांना मदत करणाऱ्या दोन चोरांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. 'रॉबिनहूड' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या व्हीआयपी चोरांची कहाणी खूप रंजक आहे. गुजरातसह देशातील अनेक शहरांमध्ये चोरीच्या घटना घडवणाऱ्या या आरोपीची पत्नी बिहारमधील नेता असून तो स्वत: पत्नीसह राजकारणात सक्रिय भूमिका बजावत होता. राजकारण आणि गुन्हेगारी जगताशी संबंधित असलेला हा कथित रॉबिनहूड बऱ्याच प्रयत्नांनंतर सुरत पोलिसांच्या हाती लागला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाचं नाव मोहम्मद इरफान उर्फ ​​उजळे अख्तर शेख, तर दुसऱ्याचं नाव मुजम्मील गुलाम रसूल शेख असं आहे. मोहम्मद इरफान उर्फ ​​उजळे अख्तर शेख हा बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर त्याचा साथीदारही सीतामढी जिल्ह्यातील पोखेरा गावचा रहिवासी आहे. मात्र, सध्या हैदराबादमध्ये राहातो.
मोहम्मद इरफान उर्फ ​​उजळे मोहम्मद अख्तर शेख हा वर्षानुवर्षे चोरी करण्यात माहीर आहे. त्याने बिहार, दिल्ली, पंजाब आणि गुजरातमधील सुरत शहरात चोरीच्या घटना घडवल्या आहेत. 27 जुलै रोजी रात्री सुरत शहरातील उमरा पोलीस स्टेशन हद्दीतील रघुवीर सोसायटीमधील बंगल्यात घुसून 6 लाख 61 हजार रुपये चोरून तो फरार झाला होता. गाडीचा नंबर सुरतचा नव्हता, त्यामुळे त्याला पकडण्यात पोलिसांना अडचण येत होती. मात्र अखेर सुरत पोलिसांनी त्याला लिंबायत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिठीखडी परिसरातून अटक केली. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी चोरीचा माल आणि एक लोडेड भारतीय पिस्तुल, दोन काडतुसं जप्त केली आहेत. यासोबतच सुरतच्या उमरा भागातील चोरीच्या घटनेची उकल सुरत गुन्हे शाखेने केली आहे.
सुमारे 5 वर्षांपूर्वी दिल्ली पोलिसांनी त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटकही केली होती, तेव्हाही तो रॉबिनहूडच्या नावाने चर्चेत आला होता. सुरत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललित बगडिया यांनी सांगितलं की, मोहम्मद इरफानने कबुली दिली आहे की तो चोरी करण्यासाठी आलिशान कारमध्ये फिरायचा आणि चोरीचे पैसे गरिबांवर खर्च करत असे. मात्र, सध्या पोलिसांना त्याच्या कथेवर विश्वास नाही. अटक केलेले दोन्ही आरोपी दिवसा रेकी करायचे आणि नंतर गुगल मॅपच्या मदतीने रात्री लोकेशनवर चोरी करायला जायचे. त्यांच्या कृत्याचा पोलिसांना किंवा इतर कोणालाही संशय येऊ नये, म्हणून जिल्हा परिषद सदस्याची पाटी गाडीवर लावण्यात आली होती. पत्नीच्या विजयानंतर सुरतमध्ये राहणाऱ्या समर्थकांचे आभार मानण्यासाठी तो आला होता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पत्नी नेता तर पती चोर; दरोड्याच्या पैशातून करायचा असं काम की, जाणून पोलीसही शॉक
राजकारण आणि गुन्हेगारी जगताशी संबंधित असलेला हा कथित रॉबिनहूड

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm