दिल्ली पोलिसांनी 15 ऑगस्टपूर्वीच 2 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या ओळखीचे 11 बांगलादेशी पासपोर्ट आणि 10 बनावट रबर शिक्के जप्त करण्यात आले आहेत. मोहम्मद मुस्तफा आणि मोहम्मद हुसेन शेख अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका जिल्ह्यात 15 ऑगस्टपूर्वी ही तपासणी मोहीम राबवली जात होती. यादरम्यान दुकानदारांना बाजारात काही संशयास्पद आढळल्यास पोलिसांना कळवण्याचा इशारा देण्यात आला. तसेच या जिल्हात भाडेकरांची आधिकृत माहिती गोळाकरण्याचे काम चालु होते.
या कारवाईत ATS अधिकारी हरिओम आणि कॉन्स्टेबल महेश यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पालम एक्स्टेंशनमधील रामफळ चौकात पोहोचले असता, तिथे एका घरातून मोहम्मद मुस्तफा आणि हुसेन शेख यांना पकडले. दोघांच्या घराची झडती घेतली असता तिथून 11 बांगलादेशी पासपोर्ट सापडले, ज्यात त्यांचे फोटो होते, पण नावे आणि पत्ते वेगळे होते. याशिवाय बांगलादेशातील विविध मंत्रालये आणि सरकारी कार्यालयांचे शिक्केही जप्त करण्यात आले आहेत.