कर्नाटक : भाजपचा भ्रष्टाचार हाच मुद्दा

कर्नाटक : भाजपचा भ्रष्टाचार हाच मुद्दा

belgavkar.com | belgaum | belgavkar

21 दिवसांत कर्नाटकातील 8 जिल्ह्यांतून 511 किमी अंतर कापणार आहेत

कर्नाटक : भाजप सरकारमधील भ्रष्टाचार हा आमच्या ‘भारत जोडो पदयात्रे’च्या चर्चेच्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक असेल. संपूर्ण भारत आपल्या वेदना आमच्यासमोर मांडत आहे, असे काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी. सांगितले. कर्नाटकाच्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलूपेट या सीमावर्ती शहरात कर्नाटकातील ‘भारत जोडो पदयात्रे’च्या प्रारंभप्रसंगी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘भारत जोडो पदयात्रा’ ही राष्ट्राचा आवाज आहे. नागरिक संपूर्ण भारत पदयात्रेत आपले दुःख सामायिक करत आहे. लोक बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचा छळ, सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण आदीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.’’
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी राज्य भाजप सरकारवर टीका केली आणि ते म्हणाले, राज्यातील लोकांना ते फक्त '40 टक्के कमिशनचे सरकार' म्हणून माहीत आहे. लाखो लोक या पदयात्रेत सहभागी होत आहेत. येथे जात, धर्म, भाषा असा कोणताही भेदभाव नाही. पाऊस, थंडी याची पर्वा न करता यात्रा सुरूच राहणार आहे. आमच्या यात्रेत द्वेष नाही, हिंसाचार नाही, यात्रेत कोणी अडखळले तर इतर त्यांना उचलून नेतात. पदयात्रेने राज्यात प्रवेश करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यांच्यासोबत पक्षाचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि इतर नेते होते. सिद्धरामय्या म्हणाले, सहा महिन्यांत काँग्रेस 2023 मध्ये होणाऱ्या निवडणुका जिंकून राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करेल. काही पोलिस कर्मचारी भाजपसोबत हातमिळवणी करत आहेत. काँग्रेस सत्तेत आल्यावर अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवू.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक : भाजपचा भ्रष्टाचार हाच मुद्दा
21 दिवसांत कर्नाटकातील 8 जिल्ह्यांतून 511 किमी अंतर कापणार आहेत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm