• Facebook
 • Youtube
 • Whatsapp
 • Instagram
 • Twitter
28072018_9846161.jpg | महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळून 33 जण ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर
28072018_768461351.jpg | महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळून 33 जण ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर
28072018_78453151.jpg | महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळून 33 जण ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर
28072018_87841512.jpg | महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळून 33 जण ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर

महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळून 33 जण ठार

महाबळेश्वरला पिकनिकसाठी काही कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेली एक बस पोलादपूर घाटातील दरीत कोसळून झालेल्या अपघातात 33 जण ठार झाले आहेत.
सुमारे 500 फूट खोल दरीत ही बस कोसळली असून बसमध्ये
कोकण दापोली कृषी विद्यापीठाचे 40 कर्मचारी होते.
सर्व जण दापोलीहून पावसाळी पिकनिकसाठी शनिवार आणि रविवार अशी जोडून सुट्टी आल्याने महाबळेश्वरला निघाले होते, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सर्वच यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही भीषण घटना पोलादपूर पासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभळी टोक गावच्या हद्दीत घडली. कोकण कृषी विद्यापीठाचे काही कर्मचारी खासगी
बसने सहलीसाठी महाबळेश्वरला निघाले होते. पोलादपूर येथे आंबेनळी घाटात अपघात झाल्यानंतर ही बस दरीत कोसळली.
या अपघातात बसचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून या अपघातातून केवळ प्रकाश सावंत हे बचावले आहेत. काही तरी विपरीत घडत असल्याचं लक्षात येताच सावंत यांनी बसमधून उडी मारल्याने ते बचावले आणि या अपघाताची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील काही ट्रेकर्सनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं असून प्रवाशांच्या बचावासाठी सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरू असल्याने पोलादपूर घाटात वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे घाटामध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या अपघातात आतापर्यंत 33 जण ठार झाल्याचे जिल्हाधिकाऱ्याने सांगितले.

दरवर्षीप्रमाणे आज सकाळी 6.30 वाजता कोकण कृषी विद्यापीठातील एकूण 28 कर्माचारी महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. त्यांच्यासोबत दोन चालकही देण्यात आले होते. असे एकूण 40 जण या बसमध्ये होते. त्यात प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह क्लरिकल स्टाफ अधिक होता. या बसमध्ये एकही महिला नव्हती. सकाळी 10.30 च्या सुमारास अपघातातील एका कर्मचाऱ्याने विद्यापीठात फोन करून बसला अपघात झाल्याचं कळवलं.

अपघातातील मृतांची नावं

सचिन गिम्हवणेकर, जयंत चौगुले, श्रेयस/सुयश बाळ, बाबू झगडे, संदीप सुर्वे, रत्नाकर पागडे, राजू रिसबूड, राजाराम गावडे, राजेश सावंत, राजू बडंबे, हेमंत सुर्वे, रोशन तबीब, निलेश तांबे, सुनील साठले, संदीप झगडे, सुनील कदम, रितेश जाधव, प्रमोद शिगवण, संतोष जळगांवकर,रवीकिरण साळवी, संजीव झगडे, पंकज कदम, विकास शिंदे, एस. आर. शिंदे, सावंत(फोंडाघाट रिसर्च स्टेशन) सचिन झगडे, किशोर चौगुले, प्रफुल्ल अहिरे, प्रमोद जाधव, संदीप भोसले, प्रशांत भांबीड(ड्रायव्हर), विनोद जाधव

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, आमदारांना आम्ही अपघाताची माहिती दिली. आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली असून आम्ही घटनास्थळाकडे जाण्यासाठीच रवाना झालो आहोत, असं विद्यापीठाचे वरिष्ठ कृषी अधिकारी संजय भावे यांनी सांगितलं.
प्रकाश सावंत नसते तर समजलाच नसता बस अपघात

प्रकाश सावंत-देसाई हे कृषी विद्यापीठात सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. हा अपघात झाला तेव्हा प्रकाश सावंत यांनी बसमधून उडी मारली. त्यानंतर ते देखील काही फूट अंतरावर दरीत कोसळले, मात्र त्यांचा जीव बचावला. त्यांनी जखमी अवस्थेत कसबसे बाहेर येऊन कृषी विद्यापीठात फोन करून बसला अपघात झाल्याचे सांगितले.

कसा आहे आंबेनळी घाट...???

पोलादपूरपासून ते महाबळेश्वर असा हा अवघड वळणांचा दीडशे वर्षांचा इतिहास असलेला हा आंबेनळी घाट आहे.
कोकण आणि पश्चिम घाटाला जोडणारा जवळपास २० किलोमीटरचा हा घाट आहे.
महाबळेश्वर हे हिलस्टेशन म्हणून विकसीत केल्यानंतर तळकोकण व मुंबई बेट येथून या ठिकाणी विश्रांतीकरता येण्यासाठी आंबेनळी घाटमार्गाची बांधणी करण्यात आली होती
घाटाचे बांधकाम १८७१ रोजी सुरू करण्यात आले व १८७६ साली ते पूर्ण झालेसध्या या घाटावर बऱ्याच ठिकाणी संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत दिसतात.
पाचशे ते आठशे फूट खोल दरी.
घाटातल्या चिरेखंडीपासून प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडा गावापर्यंत या रस्त्याच्या दोन किमी अंतरात सातत्याने अपघात होतात.