बेळगाव : स्मार्टसिटी योजनेतून शहरात बसविलेल्या 20 पैकी 5 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वीजजोडणी 'हेस्कॉम'ने तोडली. याशिवाय, स्मार्ट पोलची वीजजोडणीही तोडली आहे. यावरून महापालिका व स्मार्टसिटी विभागात वाद सुरू झाला. हा वाद मिटविण्यासाठी दोन्ही विभागांची बैठक झाली. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे व स्मार्ट पोलचे थकीत वीजबिल भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
वीजबिल भरल्यावरच 'हेस्कॉम'कडून वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. पण, यामुळे स्मार्टसिटी विभाग व महापालिकेचीही नाचक्की झाली. शहरात टाकणाऱ्यांना रस्त्यावर कचरा शोधण्यासाठी 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.