बेळगाव : नगरविकास प्राधिकरण (बुडा - BUDA - Belgaum Urban Development Authority) च्यावतीने बेळगाव ग्रामीण मतदारसंघात सुमारे 1.25 कोटी रुपये खर्चातून उद्याने उभारण्यात येणार आहेत या कामाचा प्रारंभ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते झाला. रविवारी समर्थ कॉलनी, साईनंदन रेसिडेन्सी, ड्रायव्हर्स कॉलनी, लिंगराज कॉलनीमध्ये उद्यान व संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाचा तसेच सह्याद्रीनगर उद्यानात सुमारे 25 लाख रुपये खर्चातून आंबेडकर भवन उभारण्याच्या कामाचा प्रारंभ झाला.
मतदारसंघातील नागरिकांची या भागात उद्यान उभारण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यानंतर आमदार हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून मागणी पूर्णत्वास येत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.