Fifa World Cup 2022 : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विश्वविक्रम अन् पोर्तुगालची विजयी सुरूवात;

Fifa World Cup 2022 : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विश्वविक्रम अन् पोर्तुगालची विजयी सुरूवात;

belgavkar.com | belgaum | belgavkar

अनेक विक्रम, अनेक चषकं नावावर... पण कपाटात वर्ल्डकप नाही

Fifa World Cup, Portugal vs Ghana : फुटबॉल कारकीर्दित अनेक विक्रम, अनेक चषकं नावावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) चषकाच्या कपाटात वर्ल्डकप नाही. रोनाल्डोने या सामन्यात पेनल्टीवर गोल करून विश्वविक्रम नावावर केला. पाच वेगवेगळ्या वर्ल्डकप स्पर्धांमध्ये (2006, 2010, 2014, 2018 व 2022) गोल करणारा रोनाल्डो हा जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याने लिओनेल मेस्सी (4), मिरोस्लाव्ह क्लोस, पेले व उवे सीलर यांना मागे टाकले.  पोर्तुगालने 3-2 अशा विजयासह वर्ल्डकपमधील त्यांच्या वाटचालीची सुरुवात केली. 
घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने पहिल्या हाफमध्ये लौकिकास साजेसा खेळा केला, परंतु पोर्तुगालला गोल करता आला नाही. 31 व्या मिनिटाला ख्रिस्तीयानो रोनाल्डोने गोल केला होता, परंतु चेंडू मिळवण्यासाठी त्याने घानाच्या खेळाडूला धक्का दिल्याने रेफरीने तो गोल अमान्य ठरवला. दुसऱ्या हाफमध्ये घानाचा खेळ उंचावलेला पाहायला मिळाला आणि त्यामुळे पोर्तुगालवर दडपण वाढलेले दिसले. 65व्या मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोने सर्वांना गप्प केले... रोनाल्डोला पेनल्टी क्षेत्रात पाडण्याची चूक घानाच्या बचावपटूकडून झाली आणि पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. हाती आलेली संधी न सोडणे हेच रोनाल्डोने आतापर्यंत दाखवले आहे. त्याने गोल करून पोर्तुगालला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 
वर्ल्डकप स्पर्धेत गोल करणारा रोनाल्डो हा दुसरा (37 वर्ष व 292 दिवस) वयस्कर खेळाडू ठरला. कॅमेरूनच्या रॉजर मिला याने 1994 च्या वर्ल्डकप स्पर्धेत 42 वर्ष व 39 दिवसांचा असताना गोल केला होता. पण, युरोपियन देशांमध्ये गोल करणारा रोनाल्डो वयस्कर खेळाडू ठरला, त्याने स्वीडनच्या (1958 साली) गनर ग्रेन (37 वर्ष व 236 दिवस) याला मागे टाकले. 77 व्या मिनिटाला आंद्रे आयेवकडून बरोबरीचा गोल झाला अन् पोर्तुगालच्या ताफ्यात पुन्हा चिंतेचं वातावरण पसरले. पण, पुढच्याच मिनिटाला जोओ फेलिस्कने सुरेख कौशल्य दाखवताना पोर्तुगालला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला राफेल लिओने गोल करून पोर्तुगालची आघाडी 3-1 अशी भक्कम केली. 
अखेरच्या पाच मिनिटांत रोनाल्डोला विश्रांती दिली गेली आणि 89व्या मिनिटाला घानाने संधी साधली. ओस्मान बुकारीने पोर्तुगालची बचावफळी भेदून पिछाडी 2-3 अशी कमी केली. आता पोर्तुगालकडून वेळकाढू खेळ होऊ लागला आणि 9 मिनिटांच्या भरपाई वेळेत त्यांन चेंडूवर ताबा राखत आघाडी कायम राखण्याचा प्रयत्न केला. 90+7 मिनिटाला डिएगो कोस्टाने जवळपास बरोबरीचा गोल केलाच होता, परंतु चेंडू पोस्टवरून गेला. अखेरच्या मिनिटाला पोर्तुगालच्या ताफ्यात गोंधळ पाहायला मिळाला, परंतु घाना बरोबरीचा गोल करू शकला नाही.   

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Fifa World Cup 2022 : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विश्वविक्रम अन् पोर्तुगालची विजयी सुरूवात;
अनेक विक्रम, अनेक चषकं नावावर... पण कपाटात वर्ल्डकप नाही

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm