बेळगाव : राकसकोप जवळील सोनोलीजवळ अपघातात पुलाखाली कोसळल्याने युवक जागीच ठार

बेळगाव : राकसकोप जवळील सोनोलीजवळ अपघातात पुलाखाली कोसळल्याने युवक जागीच ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने अपघातात पुलावरून खाली कोसळल्याने युवकाचा मृत्यू

बेळगाव : मालवाहू ट्रकचे नियंत्रित सुटल्याने आणि ट्रकने पुलावरील युवकाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवक पुलाखाली कोसळल्याने जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील राकसकोप जवळील सोनोलीजवळ घडली आहे. आज सकाळी बेळगाव तालुक्यातील राकसकोप जवळील सोनोली येथे लाकडाचा भुसा वाहतूक करणार्‍या मालवाहू ट्रकवरील नियंत्रण सुटले ट्रक आणि ट्रक पुलाखाली कोसळला. अपघातात पुलावर थांबलेल्या युवकाला ट्रकची धडक बसल्याने त्याचा पुलावरून कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. दिग्नेश झंगरुचे (वय 17, रा. सोनोली) असे मृताचे नाव आहे.
belgaum-बेळगाव-belgaum-loss-of-control-of-cargo-truck-accident-painful-death-of-the-driver-sonoli-rakskop-bridge-belgavkar-belgaum-20221226.jpg | बेळगाव : राकसकोप जवळील सोनोलीजवळ अपघातात पुलाखाली कोसळल्याने युवक जागीच ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर
सोनोलीतल युवक राकसकोप जवळून जात होता. समोरून येणाऱ्या ट्रकला रस्ता देण्यासाठी तो पुलावर थांबला. परंतु भरधाव आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने युवक पुलाखाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला. अपघाताबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : राकसकोप जवळील सोनोलीजवळ अपघातात पुलाखाली कोसळल्याने युवक जागीच ठार
मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने अपघातात पुलावरून खाली कोसळल्याने युवकाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm