बेळगाव-हुक्केरी : हुक्केरी शहरात शनिवारी रात्री राष्ट्रीय राखीव पोलिस कर्मचाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून चोरी झाली. हुक्केरी शहरातील बेळगाव बायपास रस्त्यावरील निवृत्त राखीव पोलिस अशोक कलाज यांच्या घराचे कुलूप तोडून 10000 रुपये व 50 ग्रॅम सोन्याची चोरी झाली आहे. घरीही कोणीही नसताना चोरट्यांनी चोरी केली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक रफीक तहसीलदार, मंजुनाथ कब्बुरी यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वान व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.