कोल्हेंचं भाषण, तो विषय अन् थेट माईकच बंद केला; संसदेत नेमकं काय घडलं, पाहा Video

कोल्हेंचं भाषण, तो विषय अन् थेट माईकच बंद केला;
संसदेत नेमकं काय घडलं, पाहा Video

belgavkar.com | belgaum | belgavkar

संसदेत शिवाजी महाराजांविषयी बोलायला गेलो, तर माईक बंद केला

खासदार अमोल कोल्हे यांचा आरोप

कोल्हे यांना बोलायला वेळ दिला, पण माइक का बंद का केला ? कोल्हे यांना काय बोलायचं होतं?
महाराष्ट्रात वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जी अपमानजनक वक्तव्य केली जात आहेत. त्यावर कायद्यात तरतूद व्हावी, फक्त छत्रपती शिवाजी महाराजच नाही, तर इतर महापुरुषांविषयी देखील बोलताना कायद्याची तरतूद करावी अशी मागणी, खासदार अमोल कोल्हे हे संसदेत करत होते, तेव्हा अमोल कोल्हे यांचं संपूर्ण बोलणं संपण्याआधी माईकचा आवाजचं संसदेच्या अध्यक्षांनी बंद केला, आणि ‘हो गया’, असं म्हटलं, त्यावर माईक बंद केल्यानंतरही अमोल कोल्हे यांनी, ‘हो गया नही अध्यक्ष महोदय, बोलने का मौका दिजिए’ असं म्हणत आपली भूमिका संसदेत सादर केली. यानंतर बाहेर येऊन खासदार अमोल कोल्हे यांनी या विरोधात आपला एक व्हिडिओ बनवला, त्यात संसदेत शिवाजी महाराजांविषयी बोलायला गेलो तर माईक बंद केला, माईक बंद केला तरी शिवाजी महाराजांविषयी भावना दाबता येणार नाहीत, तो तमाम शिवभक्तांचा आवाज, कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे देव नाहीत.पण आमच्यापेक्षा देवापेक्षा कमी नाहीत,असं देखील अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे, संसदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे, शून्य प्रहरात ते आपला प्रश्न मांडत होते. संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अपमान केल्याचा आरोप होत आहे, यानंतर महाराष्ट्रात काही संघटनांनी आंदोलन देखील केलं आहे, यानंतर या प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सर्वच महापुरुषांच्या अपमानाबाबतीत एक ठोस कायदा करण्यात यावा, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे, याविषयी अमोल कोल्हे यांनी ट्ववीटरवर व्हीडिओ देखील अपलोड केला आहे, यात अमोल कोल्हे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कोल्हेंचं भाषण, तो विषय अन् थेट माईकच बंद केला; संसदेत नेमकं काय घडलं, पाहा Video
संसदेत शिवाजी महाराजांविषयी बोलायला गेलो, तर माईक बंद केला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm