बेळगाव जिल्ह्यातीलगोकाक, मुडलगी, अथणी, कागवाड आणि निपाणीया तालुक्यांमध्ये आज दिनांक 14 जुलै रात्री 8 वाजल्यापासून 22 जुलै सकाळी 5 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. बेळगाव जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी या तालुक्यांमध्ये लाॅकडाऊन जारी केला आहे. या तालुक्यातील जनतेने लॉकडाऊन मार्गसुचीचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी केले आहे.
बेळगाव शहर व तालुक्यामध्ये लाॅकडाऊन नाहीशासनाने जाहीर केलेली लॉकडाऊन मार्गसुचीची कडक अंमलबजावणी करण्याबाबत त्या तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोना चे वाढते संक्रमण आणि मृत्यूचे प्रमाण याचा विचार करून तसेच तज्ञांशी चर्चा करून जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी कठोर उपाययोजना हाती घेण्यात आले आहेत. खानापूर रामदूर्ग, सौंदत्ती, कित्तूर, हुक्केरी, बैंलहोंगल आणि रायबाग तालुक्यात लाॅकडाऊन नाही.