हेल्प फॉर निडीतर्फे बेळगाव शहर व परिसरात सेवा - Help for Needy

हेल्प फॉर निडीतर्फे बेळगाव शहर व परिसरात सेवा - Help for Needy

belgavkar.com | belgaum | belgavkar

हेल्प फॉर निडीतर्फे बेळगाव शहर व परिसरातील 30 किलोमीटर अंतरावरील व्यक्तीचा बेळगावातील कोणत्याही रुग्णालयात मृत्यू झाल्यास तो मृतदेह त्याच्या घरापर्यंत मोफत पोचविला जातो. त्यांच्यामार्फत रोज सुमारे 1 ते 2 मृतदेह नेले जात असून आतापर्यंत 700 हून अधिक मृतदेहांना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात आले आहे. हेल्प फॉर निडीतर्फे शहरात अनेक आजाराने मृत्यू झाल्यानंतर संबंधीत व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयातून मोफत घरपोच पोहचविण्याचे काम 'हेल्प फॉर निडी'तर्फे गत दीड वर्षापासून केले जात आहे.
मात्र, आता कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतरही रुग्णालयातून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह पोहचविण्याची जबाबदारी त्यांनी घेतली असून ही सेवाही अगदी मोफत केली जाणार आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. तसेच कोरोनामुळे मृत्यूही होत आहेत. मृत्यू झाल्यानंतर सदाशिवनगर स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयाच्या शववाहिकेतून मृतदेह नेले जातात. शहरासह 30 किलोमीटर अंतरावरील कोणत्याही व्यक्तीचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह त्यांच्या घरापर्यंत शववाहिकेतून पोहचविला जातो.
कोरोना रुग्ण मृत पावल्यानंतरही आमची सेवा असेल. याबाबत जिल्हा रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. - सुरेंद्र अनगोळकर, संचालक, हेल्प फॉर निडी

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

हेल्प फॉर निडीतर्फे बेळगाव शहर व परिसरात सेवा - Help for Needy

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm