बेळगाव : गांजाप्रकरणी होणार चौकशी

बेळगाव : गांजाप्रकरणी होणार चौकशी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गांजाप्रकरणी श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपाची राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोककुमार (Additional Director General of Police Alok Kumar) यांनी गांभीर्याने दाखल घेतली आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलिस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करण्याचा आदेश त्यांनी बजावला आहे. त्यानुसार पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी खडेबाजारचे सहाय्यक पोलिस आयुक्त अरुणकुमार कोलूर यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपविली आहे.
टिळकवाडी पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या आरपीडी क्रॉस येथे 28 जानेवारीला 3 किलो गांजा जप्त केला होता. मात्र, याप्रकरणी परस्पर संशयितांना सोडून देण्यासह याप्रकरणी साधा गुन्हा देखील दाखल केलेला नाही. त्यातच रमाकांत कोंडुसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टिळकवाडीच्या पोलिस निरीक्षकास तिघा पोलिसांचा यामध्ये समावेश असल्याचा त्यांनी आरोप केला. त्यामुळे ही बाब राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोककुमार यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी बोरलिंगय्या यांच्याशी संपर्क साधून तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना केली. त्यानुसार पोलिस आयुक्तांनी चौकशीची जबाबदारी खडेबाजारच्या सहाय्यक पोलिस आयुक्तावर सोपविली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : गांजाप्रकरणी होणार चौकशी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm