बेळगाव : तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती

belgavkar.com | belgaum | belgavkar

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान | श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (बेळगाव)

छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती

बेळगाव : तिथीनुसार आज (10 मार्च) छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. हिंदवी स्वराज्याचे सम्राट असे नाव ज्यांच्या कारकीर्दीने कोरले गेले ते शिवाजी महाराज. त्यांच्या अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना रयतेचा राजा म्हटलं जातं. देशभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने मोठ्या सणाप्रमाणे साजरी केली जाते.



श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (बेळगाव) च्या वतीने हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे पार पडला. यावेळी प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक तसेच जलाभिषेक घालून जिरेटोप चढवून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जिल्हाप्रमुख किरण गावडे तसेच शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच सामूहिक आरती म्हणून महिलांच्या वतीने शिवरायांचा पाळणा म्हणण्यात आला. यावेळी बोलताना किरण गावडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. उभे आयुष्य परकिय सत्ताना धूळ चारली. आणि हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. मग अश्या राजांची आपण जयंतीही हिंदु तिथीनुसारच केली पाहिजे. गेली 25 वर्षे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यमातून आपण तिथीनुसार जयंती साजरी करतो, समाजाने ही तिथीनुसारचं जयंती साजरी करावी. शिवजयंती तिथी ही धर्मवीर बलिदान मासात येते, त्यामुळे तिथीनुसार जयंती यांच वेळेस केली पाहिजे.
गेले 20 दिवस आपण धर्मवीर बलिदान मास पाळत आहोत. त्यानिमित्त सांगली येथून येत्या काही दिवसात ती धर्मवीर ज्वाला बेळगाव येथे आणण्यात येईल. आणि 21 मार्च रोजी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मुक पदयात्रा काढून विधिवत पूजनाने ती ज्वाला शांत करण्यात येईल. यासाठी आपण सर्वांनी जमायचे असे आवाहन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते धर्मवीर संभाजी महाराज चौक अशी ही मुक पदयात्रा असणार आहे. यावेळी ध्येयमंत्राने पुजनाची सांगता करण्यात आली.
संपूर्ण पूजेचे पौरोहित्य चैतन्य छत्रे गुरुजी, रवी जोशी,  यांनी केले. यावेळी तालुका प्रमुख परशराम कोकितकर,पुंडलिक चव्हाण,अनंत चौगुले, किरण बडवण्णाचे, चंदू चौगुले, भास्कर पाटील,अंकुश केसरकर, गजानन निलजकर,प्रमोद चौगुले, शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे,अतुल केसरकर,अभिजित अष्टेकर, गजानन पाटील, अमोल केसरकर, अजित जाधव,विजय कुंटे, रामकृष्ण सुतार,अभिषेक निलजकर, आंनद कांबळे युवराज पाटील, गिरीश कनेरी, महेश गावडे, मारुती पाटील, उदित रेगे,शिवाजी गौंडाडकर, उमेश बिर्जे, गिरीश पाटील, विनायक कुंडेकर, सचिन केळवेकर, शंकर भातकांडे, महेश  गावडे, गुंडू कदम, प्रमिला पाटील,सुधा भातकांडे,वैशाली भातकांडे, वैशाली हुलजी,वर्षा आजरेकर, गीता हलगेकर,रेणू मुतगेकर,प्रिया माळवी,लता शहापुरकर, कविता पवार,इशा निलजकर,गौरी गवाने तसेच इतर महिला व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

hindu date wise chhatrapati shivaji maharaj jayanti

chhatrapati shivaji maharaj udyan

sri shiv pratisthan hindustan belgaum

belgaum belgavkar belgaum

बेळगाव : तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान | श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (बेळगाव)

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm