बेळगाव : शिवसृष्टीचे उदघाटन; शिवसृष्टी खुली करणार

बेळगाव : शिवसृष्टीचे उदघाटन;
शिवसृष्टी खुली करणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानातील श्री शिवसृष्ठी प्रकल्पाचे उदघाटन

केंद्रीय मंत्री आणि टीव्ही अभिनेत्री स्मृती इराणी तसेच विजापूरचे आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवसृष्टीचे काम रेंगाळले होते. ते काम आता पूर्ण झाले आहे. 10 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली शिवसृष्टी सर्वांनाच प्रेरणादायी ठरणार आहे. या ठिकाणी लाईट्स, लेझर आणि रेकॉर्डिंग शोच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडणार आहे. मराठी आणि कन्नड भाषेच्या माध्यमातून ही माहिती जनतेला दिली जाणार आहे. गुरुवार 16 मार्च रोजी शिवसृष्टीचे उदघाटन केले जाईल, अशी माहिती मिळाली आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानातील श्री शिवसृष्ठी प्रकल्पाचे उदघाटन उत्तर प्रदेशातील अमेठीच्या खासदार मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते होणार असून विजापूरचे आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
2013 मध्ये शिवसृष्टीचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र, काही दिवस शिवसृष्टी खुली केल्यानंतर पुन्हा बंद करण्यात आली होती. 2013 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसृष्टीचे बांधकाम पूर्ण झाले, पण तेथील ध्वनी व प्रकाश योजना सुरु झाली नाही. शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. त्याचे उद्‌घाटन 2013 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झाले. 2013 च्या निवडणुकीत आमदार अभय पाटील यांचा पराभव झाल्याने शिवसृष्टीचे काम पूर्ण करण्याकडे बुडाचे दुर्लक्ष झाले. 2017 मध्ये महापालिकेतील मराठी नगरसेवकांनी शिवसृष्टीतील प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी केली. ती कामे पूर्ण झाल्यावर शिवजयंतीच्या मुहुर्तावर शिवसृष्टीचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते 2017 मध्ये शिवसृष्टीचे दुसऱ्यांदा उद्घाटन झाले. 2013 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसृष्टीचे बांधकाम पूर्ण झाले, पण तेथील ध्वनी व प्रकाश योजना सुरु झाली न्हवती.

shiva srishti in chhatrapati shivaji maharaj udyan

in chhatrapati shivaji maharaj garden belgaum

belgaum belgaum

belgaum belgavkar belgaum

बेळगाव : शिवसृष्टीचे उदघाटन; शिवसृष्टी खुली करणार
छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानातील श्री शिवसृष्ठी प्रकल्पाचे उदघाटन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm