बेळगाव : शेतकरी कार्यालयात हजर; अधिकारी गैरहजर

बेळगाव : शेतकरी कार्यालयात हजर;
अधिकारी गैरहजर

belgavkar.com | belgaum | belgavkar

तुरमुरी-कल्लेहोळच्या शेतकऱ्यांतून नाराजी #रिंगरोड

बेळगाव : रिंगरोडसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. विविध गावच्या शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले आहे. शुक्रवारी कल्लेहोळ व तुरमुरी गावचे शेतकरी म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित होते. मात्र प्रांताधिकारी अनुपस्थित असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना माघारी फिरावे लागले. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
प्रांताधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत लेखी तक्रार दिली आहे. त्यामुळे म्हणणे मांडण्याची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. रिंगरोडसाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून देण्यात आल्या होत्या. नोटिसीला उत्तर देण्यासाठी शेतकरी टप्प्याटप्प्याने उपस्थित होते. विविध गावच्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपले म्हणणे मांडले आहे. बऱ्याचवेळा अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागले आहे.
अधिकारी फिरकलेच नाहीत
शुक्रवारी कल्लेहोळ आणि तुरमुरी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतातील काम बंद करून हे शेतकरी उपस्थित असताना प्रांताधिकारी बलराम चव्हाण हे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. शेतकऱ्यांच्यावतीने म्हणणे मांडण्यासाठी अ‍ॅड. शाम पाटील, कल्लेहोळ येथील सुभाष मरूचे व इतर शेतकरी उपस्थित होते.

belgaum belgaum ringroad farmers

ringroad appear at the farmers office officials absent belgaum

belgavkar belgaum ringroad farmers

बेळगाव : शेतकरी कार्यालयात हजर; अधिकारी गैरहजर
तुरमुरी-कल्लेहोळच्या शेतकऱ्यांतून नाराजी #रिंगरोड

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm