• Facebook
  • Youtube
  • Instagram
  • Twitter
  • Google+
news_435
सकाळी पोलीस बंदोबस्त
news_435
मध्यराञी तणावानंतर
news_435
सायंकाळी महाआरती

समाजकंटकांकडुन बेळगाव शहराला डिवचण्याचा प्रयत्न

शांत असलेल्या बेळगाव शहराच्या शांततेला डिवचण्याचा प्रयत्न काही विघ्न समाजकंटकांनी केला आहे.
शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास काही विघ्न समाजकंटकांनी भेंडीबाजार सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपावर दगडफेक केल्याची घटना घडली असुन या घटनेत मंडळाच्या मूर्तीची विटबंना झाली होती व एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती हाताळली व मंडप झाकून मूर्तीची दुरुस्ती केली आणि मंडप पुन्हा खुला केला आहे.
काही काळातच पुन्हा दगडफेक

दगडफेकनंतर काही काळातच आझाद गल्ली येथील एक प्रार्थनास्थळ व रस्त्याच्या शेजारी थांबलेल्या काही रिक्षांवरही दगडफेक करण्यात आली.

खडेबाजार पोलीस स्थानक हद्दीत येणारे ताबूत विसर्जनासाठी घेऊन जात असताना ते मार्केट पोलीस स्थानक हद्दीत का शिरले...???

शहराची कुणीही शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन बेळगाव पोलीस प्रशासन व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडुन करण्या आले आहे.
समाजकंटक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असुन त्यांना पकडण्याचा शोध सुरू आहे.

पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या नेतृत्वात परिसरात कडक पोलीस बंदोबस्त

Live update 9.00AM

घटनेच्या निषेर्धात भेंडी बाजार, पांगुळ गल्ली व परिसरातील सर्व दुकाने बंद...
शनिवारी सायंकाळी 7 वाजता महाआरतीचे आयोजन....
सर्व गणेशभक्त व बेळगावकरांना शांततेचे आवाहन...
विसर्जन मिरवणुक सुरळित पार पाडण्याचे आवाहन...

बेळगावकरांना शांततेचे आवाहन : आमदार अनिल बेनके

पहिला रविवारची गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडू व नंतर पुढील निर्णय घेवु : आमदार अनिल बेनके
कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये...

Live Update 4PM

दोन माजी पोलीस अधिकार्यांवर बेळगाव गणेश विसर्जन मिरवणुक बंदोबस्ताची जबाबदारी...

बेळगावचे माजी पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी आणि माजी पोलीस निरीक्षक पदी एस. एम. नागराज(कॅम्प आणि मार्केट पोलीस स्थानक निरीक्षक) यांच्याकडे बेळगाव गणेश विसर्जन मिरवणुक बंदोबस्ताची जबाबदारी....
रेड्डी यांच्या अनुभवामुळे त्यांना खडे बाजार ए.सी.पी पदाचा तात्पुरता पदभार...

Live Update 6PM

पोलीस उपायुक्त सीमा लाटकर व काहीच तासांपुर्वी रुजु झालेले डी.सी.पी. अमरनाथ रेड्डी व पोलीस अधिकाऱ्यांनी केला संवेदनशील भागाचा दौरा
Join Whatsapp Group www.belgavkar.com
Advertisement Contact us...
Like our Facebook Page www.belgavkar.com
Subscribe to our Youtube Channel www.belgavkar.com
22-Sep-2018
11249
बेळगाव विशेष