बेळगाव : प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांची बदली झाली

बेळगाव : प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांची बदली झाली

belgavkar.com | belgaum | belgavkar

गौतम बगादी नूतन प्रादेशिक आयुक्त

बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांची बदली झाली असून त्यांच्या जागी गौतम बगादी यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. निवडणूक आचारसंहिता जारी झाल्याने स्थानिक अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली केली जाते. याच निकषावर हिरेमठ यांची बदली झाली आहे.
ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे निवडणूक 'कालावधीपुरती त्यांची कर्नाटक ग्रामीण मूलभूत सुविधा विकास महामंडळाकडे बदली केली आहे. बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तपदासोबतच त्यांच्याकडे या मंडळाचाही कार्यभार होता. परंतु, पुढील दिड-दोन महिने ते पूर्णवेळ तेथे काम करणार आहेत. सन 2009 बॅचचे आयएएस अधिकारी असलेले गौतम बगादी यांनी यापूर्वी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. सोमवारी ते प्रादेशिक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

assembly elections Regional Commissioner Hiremath has been transferred belgaum बेळगाव belgavkar belgaum

Gautam Bagadi has been appointed Regional Commissioner belgaum बेळगाव belgavkar belgaum Regional Commissioner in the wake of assembly elections

बेळगाव : प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांची बदली झाली
गौतम बगादी नूतन प्रादेशिक आयुक्त

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm