• Facebook
  • Youtube
  • Instagram
  • Twitter
  • Google+
news_449

गोव्यात कांग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या प्रयत्नांना खिंडार ... दोन आमदारांचा राजीनामा

गोव्यात काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संध्याकाळी पाच वाजता काँग्रेसचे दोन आमदार भाजपामध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत.
मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे आणि शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी भाजपात प्रवेश
घेण्याचं निश्चित केलंय. सोपटे आणि शिरोडकर यांचे राजीनामे प्राप्त झाले असून सभागृहाचं संख्याबळ 38 वर गेल्याची माहिती गोव्याचे विधानसभा सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलीय.

गोवा विधानसभा सदस्य संख्या : 40
पण काँग्रेसच्या 2 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे ही संख्या 38 झाली आहे व काँग्रेसची संख्या 16 वरून 14 वर आली आहे.
भाजप : 14
काँग्रेस : 14
महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष : 3
गोवा फॉरवर्ड : 3
अपक्ष : 3
राष्ट्रवादी काँग्रेस : 1

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. काँग्रेसकडून गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरु होते. पण आता काँग्रेस आणि भाजप आमदारांची संख्या गोव्यात समसमान झाल्यामुळे काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या दाव्यात अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, विश्वजित राणे आणि विनय तेंडुलकर दिल्लीत दाखल झाले असून त्यांची पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत बैठक सुरू झालीय.
Join Whatsapp Group www.belgavkar.com
Advertisement Contact us...
Like our Facebook Page www.belgavkar.com
Subscribe to our Youtube Channel www.belgavkar.com
16-Oct-2018
695
राजकारण