नर्सिंग कॉलेजचे ५ विद्यार्थी वाढदिवस साजरा करण्यासाठी तिलारी धरणकाठावर गेले असता त्यापैकी सोहेल गदगे(वय १९ रा. यरगट्टी ता. सौन्दत्ती) व शिवशंकर पाटील (वय १९ रा. करगुप्पी ता. हुक्केरी) या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
शनिवारी दुपारी १२ वाजता धरणकाठावरील धामणे गावाजवळ गेले असता सोहेल व शिवशंकर या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मिळालेल्या आधार कार्ड व बँक पासबुक च्या आधारे हि नावे उपलब्ध झाली आहेत.
मृतदेह शोधण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून शोध मोहीम राबवली जात होती.
५ जणांपैकी अन्य तिघेजण(अमृत, प्रभाकर, रवी) कोठे गेले, याचा अजून थांगपत्ता लागला नसून त्यांनाही शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच दोन्ही युवक पोहताना बुडाले कि त्यांचा खून करून टाकण्यात आला हा तपास हि सुरु करण्यात येणार आहे.
घटनास्थळी अग्निशामक जवानांनाही पाचारण करण्यात आले आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस चे निरीक्षक संगमेश व त्यांच्या सहकाऱ्यांनी या शोध मोहिमेत भाग घेतला आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. चंदगड पोलिसांनीही तपास सुरु केला आहे.