• Facebook
  • Youtube
  • Instagram
  • Twitter
  • Google+
news_451
news_451
news_451

20 लोकांचे प्राण वाचवुन गोकाकचा जवान शहिद...

उमेश हेळवर (वय 35 राहणार गोकाक जिल्हा बेळगाव) असे शहीद झालेल्या हुतात्म्याचे नाव आहे. या स्फोटात तामिळनाडुचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. उमेश हा बेळगाव जिल्ह्यातील गोकक शहराचा निवासी होता.
नागमपाल भागातील इंफाळ(मणिपूर) येथे तो कार्यरत होता. शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता झालेल्या ग्रेनेड हल्यात तो शहिद झाला. शुक्रवारी राज्याचे मुख्यमंञी एन. बिरेन सिंह यांच्या कार्यक्रमाच्या काही तासा अगोदरच कांगपोकपी मध्ये एक धमाका झाला होता. व हा दुसरा हल्ला गाडीवर करण्यात आला.

मनिपुरची राजधानी इंफाळ भागातील नागमपाल येथील मार्केट मध्ये सीआरपीएफ जवान सैन्याच्या गाडीतुन कँम्प ला जात असताना अचानक गाडीवर नक्षलवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला.
नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ गाडीवर टाकलेला ग्रेनेड झेलून जवान उमेश हेलवारे यांनी गाडीबाहेर उडी मारली आणि वीस जवानांचे प्राण वाचवले. ग्रेनेड गाडीत फुटला असता, तर वीस जवान दगावले असते, मात्र उमेशनी जीवाची पर्वा न करता ग्रेनाईड हल्ला बाहेरच्या बाहेर थोपवून लावला. गेल्या चार वर्षांपासून ते मणिपूर भागात सेवा बजावत होते. या स्फोटात उमेशने 20 लोकांचे प्राण वाचविला, पण तो देशासाठी शहीद झाला.
उमेशचे पार्थीव आज गोकाकला आणण्यात येणार आहे.
Live Update Monday

नक्षलवाद्यांनी फेकलेला ग्रेनेड झेलून 20 सहकारी सीआरपीएफ जवानांचे प्राण वाचवणाऱ्या वीर योद्ध्याला अखेरचा निरोप देण्यात आला.
वीरमरण प्राप्त झाल्यावर खास विमानाने सोमवारी सकाळी त्यांचं पार्थिव बेळगावला आणण्यात आलं. शासकीय इतमामात गोकाकमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
Join Whatsapp Group www.belgavkar.com
Advertisement Contact us...
Like our Facebook Page www.belgavkar.com
Subscribe to our Youtube Channel www.belgavkar.com
21-Oct-2018
2877
अपघात