• Facebook
  • Youtube
  • Instagram
  • Twitter
  • Google+
news_454
news_454

नगरसेविका सरला हेरेकर यांचे विद्युत खांबावर चढून आंदोलन

बेळगाव महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात वार्ड क्रंमाक ४१ च्या नगरसेविका सरला हेरेकर यांनी चक्क विद्युत खांबावर चढून आंदोलन केले आहे.
सदाशिवनगर भागात अनेक ठिकाणी रस्त्यावरील विद्युत खांबावर प्रकाश नसतो. बरेच विद्युत दिवे खराब झाले आहेत. व तक्रार करून हि याकडे कोणीच लक्ष घालत नाही.
१०-१५ फूट वर खांब्याच्या वर चढून त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात जवळपास ४० मिनिट धरणे आंदोलन केले. तसेच सदाशिवनगर स्मशान भूमीतील खांबावरील दिवे अनेक दिवसांपासून बंदच आहेत. तर काही दिवे खराब झाले आहेत.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत होणारी सर्व कामे रखडलेली आहेत. व या भागात विकास केला जात नाही. अनेकदा हेस्कॉम अधिकारी व महानगर पालिकेत हा विषय मांडूनही कोणीच याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांनी हा पर्याय निवडला. जोपर्यंत पालिका अधिकारी येत नाहीत तोवर त्यांनी खाली न येण्याचा निर्धारच धरला होता.

घटनास्थळी बेळगाव एपीएमसी पोलिस स्थानक दाखल झाले. तसेच पालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांना खाली येण्यास भाग पडले. तब्बल ८-१० पोलिसांच्या मदतीने त्यांना शिडी लावून खाली उतरविण्यात आले.
Join Whatsapp Group www.belgavkar.com
Advertisement Contact us...
Like our Facebook Page www.belgavkar.com
Subscribe to our Youtube Channel www.belgavkar.com
30-Oct-2018
1072
Corporation बेळगाव