• Facebook
  • Youtube
  • Whatsapp
  • Instagram
  • Twitter
20112018_ODFCity.jpg | बेळगाव शहर हागणदारीमुक्त... | belgaum news | belgavkar बेळगावकर
swachh-bharat-abhiyan.jpg | बेळगाव शहर हागणदारीमुक्त... | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहर हागणदारीमुक्त...

भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर (ओपन डिफेक्शन फ्री Open defecation free) म्हणून बेळगाव शहराची निवड
करण्यात आली आहे. बेळगाव शहराला प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

बेळगाव महानगर पालिका आययुक्त श्री शशिधर कुरेर यांनी हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एंड अर्बन अफेयर्स या विभागाने हे प्रमाणपत्र दिले आहे.
'स्वच्छ भारत अभियान' हे खऱ्या अर्थाने लोक चळवळ बनली आहे. 

जिल्हय़ात 5 लाख 47 हजार स्वच्छतागृहांच्या निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गेल्या साडेपाच वर्षात यापैकी एकूण 5 लाख 33 हजार स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. अद्यापही 14 हजार 680 स्वच्छतागृहांची बांधणी शिल्लक असून यापैकी 7,900 स्वच्छतागृहे निर्माणास मंजुरी मिळाली होती. स्वच्छ भारत योजनेंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण- 2018 कार्यक्रम देशभरात राबविण्यात आला होता. सदर सर्वेक्षण बेळगाव जिल्हय़ातही राबविण्यात आले होते.