• Facebook
  • Youtube
  • Instagram
  • Twitter
  • Google+

वाजवा रे वाजवा... बेळगावात फटाके संध्याकाळी 8 ते राञी 10 वेळतचं...

news_458
दिवाळीत फटाके फोडण्याच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. कारण, फटाके उडविण्याची वेळ ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला दिला होता. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या म्हणजेच रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडणे बंधनकारक नसणार आहे.
फटाके फोडण्यासाठीचे दोन तास कधी द्यायचे, हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आता प्रत्येक राज्य सरकारला दिले होते. यामध्ये सकाळी एक तास आणि रात्री एक तास असा  देखील वेळ दिला जाऊ शकतो, असेही सांगण्यात आले होते.

फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी यापूर्वी सुप्रीम कोर्टानं रात्री 8 ते 10 पर्यंतची वेळ ठरवून दिली होती. दिवाळीसाठी राज्य सरकार फटाके फोडण्याबाबतची वेळ ठरवू शकेल, असे कोर्टाने म्हटले होते.
त्यामुळे, आता कर्नाटक सरकारने फटाके फोडण्यासाठी वेळ संध्याकाळी 8 ते राञी 10 ठरविली आहे.
पण, एक दिवसात केवळ दोनच तास फटाके फोडता येतील, हेही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

धार्मिक परंपरेचा दाखला देत तामिळनाडू सरकारने या संबंधी याचिका केली होती. 
Like our Facebook Page www.belgavkar.com
Subscribe to our Youtube Channel www.belgavkar.com
03-Nov-2018
450
आपला भारत देश