• Facebook
  • Youtube
  • Whatsapp
  • Instagram
  • Twitter
ReporterCartoon_1.jpg | दिवाळी विशेष करमणूक लेख : हप्तामंञी | belgaum news | belgavkar बेळगावकर

दिवाळी विशेष करमणूक लेख : हप्तामंञी

आधी जवळीक साधायची, त्यांच्या पैशांची दारू ढोसायची, आंबट जोक करायचे, माझी ह्या नेत्याशी ओळख आहे, तूमच आडलेल काम करतो म्हणून सांगायच आणि बरोबर लुटायच....
हे तर सोडाच जर का तुमच कुठल आधीच प्रकरण जर ह्याला समजल तर ब्लॅकमेल करून हप्ता काढलाच म्हणुन समजा live दाखवतो, live दाखवतो, वर्तमान पञात बातमी देतो म्हणुन फिरणारा, बिनकामी पण फुल्ल पगारी 'नारद' नागरिकांची मोठी डोकेदुखी बनून राहिला आहे.

कोणताही अनुभव नसताना, गावच्या कट्यावर टवाळक्या करत फिरणार आता हप्तामंत्री झाला आहे. स्वयंघोषित असणारा ह्या उचापती खोराने ब्लॅकमेलिंगच्या धंद्यात एवढी काही भरारी घेतली आहे की सगळीच जण ह्याच्याशी दोन हात लांब आहेत.

चांगल्या घरातील स्त्रीया दिसल्या की ह्याची लाळ सुटलीच बघा. माझी, माझी ओळख म्हणुन सांगून महिलांना राजकारणात तुम्हाला संधी उपलब्ध आहेत म्हणून सांगायच आणि पैसा लाटणारा हा लांडगा अनेक पतींची डोकेदुखी बनला आहे. गेल्याच महिन्यात ह्याने एकाची गोपनीय वैवाहिक बातमी देवुन त्याला चांगलच गाठुन लाखोंचा डल्ला मारला आहे. अनेकांविरूध्द मानहानीचे लेख टाकणार्‍या या लांडग्याविरूध्द लवकरच मानहानीबाबत पाऊल टाकले जाणार आहे.