• Facebook
  • Youtube
  • Instagram
  • Twitter
  • Google+

एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना ए. सी. बी च्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले...

news_460
कर्नाटक अर्बन वाटर अँड ड्रेनेज (Karnataka Urban Water Supply and Drainage Board) विभागाचे साहाय्यक अभियंता विनायक मकनुर यांना एक लाख रुपयांची लाच स्विकारताना ए. सी. बी.(Anti Corruption Bureau लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) च्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले आहे. सोमवारी दुपारी विश्वेश्वरय्या नगर येथील पाणी पुरवठा खात्याच्या कार्यालयात धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. बिले मंजूर करण्यासाठी साहाय्यक अभियंता मोठय़ा प्रमाणात पैशाची मागणी करीत होता. त्यामुळे वैतागलेल्या कंत्राटदाराने या संबंधी एसीबीकडे तक्रार केली होती.

ठेकेदार सुरेश खिराई यांच्याकडुन थकित बिल पास करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. एसीबीचे पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, पोलीस उपअधीक्षक जे. रघु, पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी आदी अधिकाऱयांनी ही कारवाई केली.
Like our Facebook Page www.belgavkar.com
Subscribe to our Youtube Channel www.belgavkar.com
05-Nov-2018
352
क्राइम