Karnataka Assembly Election 2023; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मान्य केला पराभव; म्हणाले, “आम्ही…”

Karnataka Assembly Election 2023;
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मान्य केला पराभव;
म्हणाले, “आम्ही…”

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली

Karnataka Election Results 2023 : भाजपाचा दारूण पराभव, कर्नाटकात काँग्रेसची एकहाती सत्ता, कोणत्या पक्षाला किती जागा?

पक्ष एकूण
काँग्रेस 136
भाजपा 65
जेडीएस 19

Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदारसंघांसाठी 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतदानानंतर अनेक चाचण्यांचे निष्कर्ष हे काँग्रेसच्या बाजूने होते. तोच कल आता मतमोजणीतही पाहायला मिळत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार काँग्रेस 131 जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी 66 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसला 21 जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, आता भारतीय जनता पार्टीने त्यांचा कर्नाटकमधला पराभव मान्य केला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते बसवराज बोम्मई आतापर्यंत हाती आलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले, तरीदेखील आम्ही निवडणुकीत उचित लक्ष्य गाठू शकलो नाही. निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती आल्यावर आम्ही त्याचं तपशीलवार विश्लेषण करू. या निकालातून धडा घेत आम्ही लोकसभा निवडणुकीत नक्कीच पुनरागमन करू.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा कल शेवटपर्यंत असाच राहिल्यास काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करू शकतं. कर्नाटकमध्ये 38 वर्षांपासून एकाच पक्षाची सलग दोनदा सत्ता आलेली नाही. ही परंपरा यावेळी देखील कायम राहील असं दिसतंय.

Karnataka Election 2023 Results Cm Basavaraj Bommai Accepted Defeat

Karnataka Assembly Election 2023

Karnataka Assembly Election 2023; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मान्य केला पराभव; म्हणाले, “आम्ही…”
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm