टीव्ही इंडस्ट्रीला धक्का; ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडेंचं निधन

टीव्ही इंडस्ट्रीला धक्का;
‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडेंचं निधन

belgavkar.com | belgaum | belgavkar

कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू

प्रसिद्ध अभिनेता नितेश पांडे यांचं निधन झालं आहे. कार्डियक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला. अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं 51 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. नितेश पांडे हे नाशिक येथील इगतपुरीजवळ शूटिंगसाठी गेले होते. मंगळवारी (23 मे) रात्री हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. नितेश पांडे यांच्या पत्नीचा भाऊ व निर्माता सिद्धार्थ नगर यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
‘ईटाइम्स’शी संवाद साधताना ते म्हणाले, “नितेश माझ्यापेक्षा खूप तरुण होते. त्यांना हृदयासंबंधित कोणताही विकार नव्हता. त्यांच्या निधनाने माझ्या बहिणीला धक्का बसला आहे. तिच्याशी मी बोलूही शकत नाहीये.” “नितेश यांच्या निधन झाल्याचं समजल्यानंतर त्याचे वडील लगेचच इगतपुरीला रवाना झाले आहेत. मी सुद्धा इगतपुरीला जात आहे,” असंही सिद्धार्थ नगर म्हणाले. नितेश पांडे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
नितेश यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अनुपमा’ या मालिकेत ते शेवटचे दिसले होते. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. याशिवाय ‘दबंग 2’, ‘खोसला का घोसला’ या चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे.

Anupamaa actor Nitesh Pandey dies of a cardiac arrest at 51 shocked TV fraternity responds

Anupamaa Actor Nitesh Pandey Dies Of Cardiac Arrest at 51 Mortal Remains To Reach Mumbai

Anupamaa actor Nitesh Pandey passes away due to cardiac arrest

टीव्ही इंडस्ट्रीला धक्का; ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडेंचं निधन
कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm