बेळगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

belgavkar.com | belgaum | belgavkar

शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मार्ग वाहनांसाठी बंद

बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी शनिवारी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. प्रमुख मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. राणी चन्नम्मा चौकातून खानापूरकडे जाणारी वाहने क्लव रोडमार्गे गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शर्कत पार्क, ग्लोब सिनेमागृह समोरुन खानापूर रोडवर वळवण्यात आली आहे.

देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक, कंबळी खूट, पिंपळ कट्टा, पाटील गल्लीकडे जाणारी वाहने जिजामाता सर्कलमधून जुन्या पी. बी रोडवरुन पुढे जातील.
गोवावेस सर्कल आणि नाथ पै सर्कलमधून बँक ऑफ इंडिया सर्कलमार्गे कपिलेश्वर उड्डाण पुलाकडे जाणारी वाहतूक बँक ऑफ इंडिया सर्कलमधून कुलकर्णी गल्ली, वैभव हॉटेल क्रॉस, जुना पी. बी. रोडवरुन पुढे जातील.

जुना पी. बी. रोड, व्हीआरएल लॉजिस्टीक व भातकांडे स्कूल क्रॉसमार्गे कपिलेश्वर उड्डाण पुलावरुन जाणारी वाहतूक भातकांडे स्कूल क्रॉससमोरुन शिवाजी गार्डन, बँक ऑफ इंडिया क्रॉस ते महात्मा फुले क्रॉस मार्गे पुढे जातील.

जुना पी. बी. रोड, यश रुग्णालय, महाव्दार रोड, कपिलेश्वर मंदिर रोडने जाणारी वाहने यश रुग्णालयासमोरुन तानाजी गल्ली, रेल्वे फाटकातून पुढे जाणार आहेत.
गुड्स शेड रोडवरुन कपिलेश्वर उड्डाण पुलावरुन जाणारी वाहतूक रेणुका हॉटेल, एसपीएम रोडवरुन मराठा मंदिर गोवावेस सर्कलकडे जातील.

खानापूर रोड, बीएसएनएल क्रॉस, स्टेशन रोड आणि गोगटे सर्कल, रेल्वे स्टेशन, पोस्टमन सर्कलकडुन शनी मंदिरकडे जाणारी वाहतूक ग्लोब सर्कलसमोरुन शर्कत पार्क, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शौर्य चौक, गांधी सर्कल, क्लब रोड, चन्नम्मा सर्कलकडे जाईल.
मिरवणूक मार्ग वाहनांसाठी बंद
चन्नम्मा सर्कलपासून कॉलेज रोड ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंतची वाहतूक व्यवस्था मिरवणूक संपेपर्यंत बंद असणार आहे. मिरवणूक मार्गावरील वाहतूक दुपारी दोनपासून बंद असणार आहे. त्यामुळे, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Shiv Jayanti Chitrarath procession traffic system in the city has been changed Traffic diverted belgaum बेळगाव belgavkar belgaum

Shiv Jayanti Chitrarath procession Traffic diverted belgaum बेळगाव

बेळगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मार्ग वाहनांसाठी बंद

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm