पावसापेक्षाही ओव्हलवर मोठे संकट घोंघावतेय...! WTC फायनलसाठी 2 खेळपट्ट्या;

पावसापेक्षाही ओव्हलवर मोठे संकट घोंघावतेय...!
WTC फायनलसाठी 2 खेळपट्ट्या;

belgavkar.com | belgaum | belgavkar

ICC World Test Championship, 2023

आजपासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळविला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ही लढत होणार आहे. या टेस्टमध्ये काही नियम बदलण्यात आले आहेत. याचबरोबर या टेस्टवर पावसाचे सावटही असणार आहे. लंडनच्या ओव्हलवर सामना असला तरी खेळपट्टीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.  भारतीय संघ कसून सराव करत आहे. इंग्लंडमध्ये खेळपट्टी साधारणपणे गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. येथे चेंडू अधिक स्विंग होतो, त्यामुळे उपखंडातील फलंदाजांना येथे फलंदाजी करणे कठीण जाते. ओव्हलच्या खेळपट्टीबाबत, इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले होते की, हे वानखेडेसारखे आहे म्हणजेच या खेळपट्टीवर उसळी असेल. पिच क्युरेटरनेही या खेळपट्टीवर उसळी असेल याची पुष्टी केली आहे. 
पावसापेक्षा या सामन्यावर आणखी एक मोठे संकट आहे. ओव्हलच्या स्टेडिअम मॅनेजमेंटने डब्ल्यूटीसी फायनलसाठी दोन पिच तयार केली आहेत. लंडनमध्ये सध्या ऑईल प्रोटेस्ट सुरु आहे. यामुळे आंदोलक खेळपट्टी उखडू किंवा खराब करू शकतात. या भीतीने दोन पिच तयार करण्यात आली आहेत. जर असे झाले तर दुसऱ्या पिचवर सामना खेळविला जाण्याची शक्यता आहे.  लंडनमध्ये 'जस्ट स्टॉप ऑइल' ची निदर्शने होत आहेत. आंदोलक यूके सरकारच्या नवीन तेल, वायू आणि कोळसा प्रकल्पांना विरोध करत आहेत. सरकारने या प्रकल्पांशी संबंधित परवाने तातडीने रद्द करावेत, अशी त्यांची मागणी आहे. हे आंदोलक खेळपट्टीचे नुकसान करू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. त्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्थाही लावण्यात आली आहे. 
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड (ओव्हल येथे) :
भारत - 14 कसोटी, 2 विजय, 5 पराभव, 7 अनिर्णित
ऑस्ट्रेलिया - 38 सामने, 7 विजय, 17 पराभव, 14 अनिर्णित

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी रेकॉर्ड :
एकूण 106 सामने - भारताने 32 जिंकले, ऑस्ट्रेलियाने 44 जिंकले, 29 अनिर्णित, 1 बरोबरीत

wtc 2023 final ind vs aus crisis on the oval than the rain Two pitches for WTC finals

ICC World Test Championship 2023

पावसापेक्षाही ओव्हलवर मोठे संकट घोंघावतेय...! WTC फायनलसाठी 2 खेळपट्ट्या;
ICC World Test Championship, 2023

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm