बेळगाव : वडगाव ग्रामदेवता मंगाई देवी यात्रा; घालण्यात येणार गाऱ्हाणे

बेळगाव : वडगाव ग्रामदेवता मंगाई देवी यात्रा;
घालण्यात येणार गाऱ्हाणे

belgavkar.com | belgaum | belgavkar

शेतकरी व विणकरांची यात्रा - मंगाई देवीची यात्रा

बेळगाव शहरातील सर्वात मोठी यात्रा - वडगाव ग्रामदेवता मंगाई देवी

बेळगाव : वडगावची ग्रामदेवता, नवसाला पावणारी देवी आणि पावसाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मंगाई देवीची यात्रा यंदा जोरात होणार आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंगाई देवीला वार पाळून गाऱ्हाणे घालण्यात येतात. श्री मंगाई देवीची यात्रा यावेळी पारंपरीक पद्धतीने होणार आहे. यात्रोत्सव मंगळवार 11 जुलै रोजी होणार आहे. शेतकरी व विणकरांची यात्रा म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंगाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय पंच मंडळीने घेतला आहे. मंगाई देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस जरी मंगळवार असला तरी आठवडाभर याठिकाणी यात्रोत्सव सुरू असतो.
श्री मंगाई देवीला शुक्रवार 9 जून रोजी गाऱ्हाणे घातले जाणार आहेत. रात्री 8 वा. हा कार्यक्रम होणार असून यावेळी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाऱ्हाणे घातल्यानंतर सलग 9 वार पाळण्यात येतात. दोन सोमवार, दोन शुक्रवार आणि पाच मंगळवार चा समावेश आहे. गाऱ्हाणे घातल्यानंतर यात्रा होईपर्यंत लग्नकार्य, मांसाहार व इतर कार्यक्रम देवीच्या परिसरात होणार नाहीत, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पुजार्‍यांनी केले आहे. यात्रेनिमित्त देवीच्या हद्दीतील भागात वार पाळण्यात येत असून, वार दिनी कुमारिकांच्यावतीने देवीच्या हद्दीतील मंदिरात पूजन केले जाते. शेकडो कुमारिका या कार्यक्रमात भाग घेत असतात. या यात्रेस हमखास पाऊस असतोच तरीही भर पावसातही हजारो देवीभक्तांची दर्शनासाठी रिघ लागलेली असते. दरवर्षी लाखो लोकांची गर्दी होणार्‍या मंगाई देवीच्या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे सर्वांनाच या यात्रेची आतूरता लागून राहिलेली असते. परंपरे प्रमाणे एक महिना वार पाळले जाणार. दरवर्षी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात होते. यात्रा काळात हजारो लोकांची दर्शनासाठी गर्दी असते.
बेळगाव शहरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असणाऱ्या वडगाव येथील ग्रामदेवता मंगाई देवीची यात्रा साजरी करण्याचा निर्णय पुजारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. वडगाव येथील मंगाई देवीचा यात्रोत्सव शहरातील सर्वात मोठा उत्सव असून दरवर्षी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात होते. यात्रा काळात हजारो लोकांची दर्शनासाठी गर्दी असते. कोरोना संकटामुळे गेली दोन वर्ष यात्रा रद्द करण्यात आली होती. यात्रा काळात दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. अनेक व्यापारी यात्राकाळात येतात. त्यामुळे मंगाईदेवीची यात्रा व्यापाऱ्यांसाठी पर्वणी असते.

belgaum mangai devi vadgaon mangai devi festival belgaum festival belgaum

vadgaon mangai devi festival vadagav belgaum

बेळगाव : वडगाव ग्रामदेवता मंगाई देवी यात्रा; घालण्यात येणार गाऱ्हाणे
शेतकरी व विणकरांची यात्रा - मंगाई देवीची यात्रा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm