बेळगाव : कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांना विशेष दर्जाचे मंत्री पद जाहीर करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी म्हणून केंद्रीय प्रतिनिधित्वाचा पदभार स्वीकारल्यानंतर शंकरगौडा पाटील यांचे आज दिल्लीहून बेळगावला आगमन झाले. त्यांच्यावर सोपविण्यात आलेला नव्या पदाचा भार स्वीकारल्यानंतर ते आज बेळगावला प्रथमच आले. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता सांबारा विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्या नावाचा जय घोष करण्यात आला.
त्यानंतर प्रथम त्यांनी कित्तूर चन्नम्मा चौक येथील श्री गणपती मंदिरात दर्शन घेऊन पूजन केले. तसेच वीर राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. तेथून पुढे त्यांनी शहरात प्रवेश केला. त्यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव, डॉ. रवी पाटील, बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, वैभव खाडे, श्रेयस नाकाडी, परेश नाईक, अर्चना पाटणेकर, भाजप महानगर अध्यक्ष शशिकांत पाटील, गजेश नादगडकर, दिनेश वलगार, मल्लिकार्जुन सत्तीगेर, प्रवीण पाटील, गजानन मिसाळे आदींसह इतर पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले.
आता ते केंद्र सरकारसाठी राज्य सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून नवी दिल्ली येथे काम पाहणार आहेत. हे पद कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद आहे. पाटील हे राज्य सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी बनले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या राजकिय सचिव पदा सोबत त्यांना ही बंपर लॉटरी लागली आहे.