IND Vs AUS : वर्ल्डकपच्या आधी भारतीय संघाने बदलला कर्णधार
1st two ODI

IND Vs AUS : वर्ल्डकपच्या आधी भारतीय संघाने बदलला कर्णधार

belgavkar.com | belgaum | belgavkar

अश्विनची एंट्री, कुणाला मिळाली संधी?

विराट-रोहितला आराम, राहुलकडे नेतृत्व, वनडे मालिकेसाठी शिलेदारांची घोषणा

India Vs Australia ODI India Squad : मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. केएल राहुल याच्याकडे नेतृत्व देण्यात आलेय. रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांना पहिल्या 2 सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे. त्याशिवाय महत्वाचे म्हणजे या वनडे मालिकेत आर. अश्विन याला प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे.  ऑस्ट्रेलियाविरोधातील वनडे मालिका सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठी अग्निपरीक्षा असेल. कारण, आशिया चषकात दोघांनाही तितकी संधी मिळालेली नव्हती. त्यामुळे विश्वचषकाआधी ही दोन्ही खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका महत्वाची आहे. दोन्ही संघाना खेळण्यासाठी अखेरचे 3 सामने असतील. त्यानंतर विश्वचषकाचा थरार सुरु होणार आहे. 
india-squad-announcement-for-aus-live-ashwin-returns-kl-to-lead-in-1st-2-odis-202309_1.jpg | IND Vs AUS : वर्ल्डकपच्या आधी भारतीय संघाने बदलला कर्णधार | belgaum news | belgavkar बेळगावकर
3rd ODI
आर. अश्विनला संधी : अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे वॉशिंगटन सुंदर आणि आर. अश्विन यांना संधी मिळाली आहे. अक्षर पटेलची दुखापत गंभीर असल्यास या दोघांपैकी एका खेळाडूला विश्वचषकाचे तिकिट मिळू शकते.  आर अश्विनचा अनुभव पाहता टीम इंडिया त्याला संधी देऊ शकते. ऑस्ट्रेलियाविरोधात अश्विन कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.
Squad for the 1st two ODIs:
KL Rahul (C & WK), Ravindra Jadeja (Vice-captain), Ruturaj Gaikwad, Shubman Gill, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Tilak Varma, Ishan Kishan (wicketkeeper), Shardul Thakur, Washington Sundar, R Ashwin, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Mohd. Siraj, Prasidh Krishna



Squad for the 3rd & final ODI:
Rohit Sharma (C), Hardik Pandya, (Vice-captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, KL Rahul (wicketkeeper), Ishan Kishan (wicketkeeper), Ravindra Jadeja, Shardul Thakur, Axar Patel*, Washington Sundar, Kuldeep Yadav, R Ashwin, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Mohd. Siraj
भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार, विकेकटकीपर), रविंद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दूल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचं वेळापत्रक
आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे.  पहिला एकदिवसीय सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर 24 आणि 27 सप्टेंबर रोजी इंदौ आणि राजकोट येथे लढत होणार आहे. विश्वचषकाच्या आधी होणारी ही वनडे मालिका तयारीसाठी महत्वाची आहे.
भारताविरोधात वनडे मालिकेसाठी  ऑस्ट्रेलियाची टीम
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा.

India squad announcement for AUS Live : Ashwin returns KL to lead in 1st 2 ODIs

India Vs Australia 2023 Team India Squad Announcement : R Ashwin To Get Selected

IND Vs AUS : वर्ल्डकपच्या आधी भारतीय संघाने बदलला कर्णधार
अश्विनची एंट्री, कुणाला मिळाली संधी?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm