धरणावर मौजमस्ती पडली महागात; अचानक पाणी वाढलं अन्... थरारक VIDEO व्हायरल

धरणावर मौजमस्ती पडली महागात;
अचानक पाणी वाढलं अन्... थरारक VIDEO व्हायरल

belgavkar.com | belgaum | belgavkar

धरणाच्या पाण्यात व्हिडीओ बनवणं आलं जीवाशी. Shocking Video : घडलं थरारक

पावसाळा सुरु असून अनेक भागांत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये निसर्गरम्य वातावरण झालं असून पर्यटक फिरायला जात आहेत. मात्र पावसाळ्यात फिरायला जाणं जेवढं रम्य वाटतं तेवढंच ते धोकादायकही आहे. मुसळधार पावसात फिरायला गेलेल्या पर्यटकांसोबत धक्कादायक घटना घडल्याचंही समोर येतात. अशीच आणखी एक अंगावर काटा आणणारी घटना घडली असून याचा व्हिडीओही समोर आला आहे.
काही पर्यटक फिरायला गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र व्हिडीओ बनवण्याच्या नादात लोकांनी समोरुन येणाऱ्या मोठ्या लाटेकडे दुर्लक्ष केलं. लाट एकदम अंगावर आल्यावर पर्यटक पळायला लागले. मात्र पुढे थरारक घडलं. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही पर्यटक फिरायला गेले आहेत. ते मस्त धरणाच्या पाण्यात उभे राहून निसर्गाचा आनंद लुटत आहेत. काहीजण व्हिडीओ बनवण्यामध्ये व्यस्थ असलेले पहायला मिळत आहे. तेवढ्यात एक लाट येते. त्यानंतर व्हिडीओ बनणारे बाजूला जातात. लाटेचा वेग एवढा असतो की यामध्ये एक व्यक्ती वाहून जातो. हे दृस्य कॅमेऱ्यात टिपण्यात आलं असून हा व्हिडीओ खूपच थरारक आहे.
@malayalees54 नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मलेशियातील हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे.

making video water of the dam was thrilling with the life

video in the water of the dam

धरणावर मौजमस्ती पडली महागात; अचानक पाणी वाढलं अन्... थरारक VIDEO व्हायरल
धरणाच्या पाण्यात व्हिडीओ बनवणं आलं जीवाशी. Shocking Video : घडलं थरारक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm