बेळगाव : नववी आणि अकरावी पब्लिक परीक्षा

बेळगाव : नववी आणि अकरावी पब्लिक परीक्षा

belgavkar.com | belgaum | belgavkar

परीक्षा संबंधित शाळा-महाविद्यालयांमध्येच

Summative Assessment 2 for Class 9 students and annual examination for Class 11 students from the year 2023-24 by KSEEB
बेळगाव : विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी यंदापासून नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी पब्लिक परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षापासूनच नववीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलनात्मक मूल्यमापन 2 (Summative Assessment-2) आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण केले जाणार नाही.
सध्या पाचवी, आठवी वर्गांसाठी मूल्यांकन परीक्षा आणि दहावी, बारावीसाठी शालेय शिक्षण आणि मूल्यमापन निर्णय मंडळाकडून बोर्डाची परीक्षा घेतली जात आहे..आता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी याच धर्तीवर बोर्डाची परीक्षा घेतली जाणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता जाणून ती वृद्धिंगत करणे शक्य होणार आहे. परीक्षेसाठी मंडळाकडूनच प्रश्नपत्रिका तयार केल्या जाणार आहेत. मात्र, परीक्षा संबंधित शाळा-महाविद्यालयांमध्येच होणार आहे.
नववीच्या प्रश्नपत्रिका गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगइन आयडीवर अपलोड केल्या जातील. नंतर त्यांची छपाई करुन संबंधित तालुक्यातील शाळांना वितरीत केल्या जातील. तसेच आजुबाजूच्या परिसरातील शाळांच्या शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले जाणार आहे. तालुका पातळीवर उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन होईल. As per the notice, the question Papers for Class 9th Summative Assessment-2 will be published by Karnataka State Quality Assessment and Accreditation Council (KSQAAC). It will be prepared at state level by and made available in the login of concerned field education officers made available by the concerned Deputy Director of School Education Department (in the login of Pre-Graduation Department).The question Papers for Class 11th Annual Examination will be prepared at the state level by the PU Examination Section of the Karnataka School Examination and Evaluation Board. The evaluation of papers for Class 9 and 11 annual exams will take place at school and college levels respectively unlike class 10 and 12 Further the notice states that if the student fails in the annual examination of class 11, then the supplementary examination will be conducted at the respective college level

belgaum belgavkar बेळगाव belgaum Classes 9 and 11 in Karnataka to have exams from this academic year Summative Assessment for Class 9 students and annual examination for Class 11 students

belgaum Karnataka announces exams for Class 9 11 from academic year 2023 24 check details belgaum

बेळगाव : नववी आणि अकरावी पब्लिक परीक्षा
परीक्षा संबंधित शाळा-महाविद्यालयांमध्येच

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm