बेळगाव गणेशोत्सव : हिडकल डॅममधील विठ्ठल मंदिर झालयं दर्शनासाठी खूले;

बेळगाव गणेशोत्सव : हिडकल डॅममधील विठ्ठल मंदिर झालयं दर्शनासाठी खूले;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बाप्पा समोर साकारलं 'विठ्ठल मंदिर' Video;
बेळगावच्या गणेश उत्सवाला ऐतिहासिक परंपरा

बेळगाव : मे-जून महिन्यात पाऊस न पडल्यामुळे हिडकल (ता. हुक्केरी) येथील राजा लखमगौडा जलाशयातील होन्नूर बिरदेव विठ्ठल मंदिर यंदा दर्शनासाठी खुले झाले होते. 5 वर्षांनंतर हे मंदिर पूर्णपणे पाण्यापासून खुले झाले होते. (29 जून 2023) आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील मूर्तीचे दर्शन हजारो भाविकांनी घेतले. सोशल मिडियावर धरणातील मंदिराचे फोटो व्हायरल हजारो भाविकांनी या मंदिराला भेट देवून विठ्ठलाला आपल्या मागण्यांसाठी साकडं घातल. 1928 मध्ये या परिसरातील जनतेने येथील घटप्रभा नदीकाठावर विठ्ठल मंदिर व बाजूस धर्मशाळेची उभारणी केली होती. मात्र, हिडकल जलशयाच्या बांधकामात सर्वप्रथम मुख्य भिंतीच्या पायाखाली होसकोटी व नदीपलीकडील होन्नूर ही गावे पाण्याने वेढली गेली. यात विठ्ठल मंदिर पाण्याखाली गेले असले, तरी भाविकांनी जवळच उंचीवर नवीन मंदिर उभारले आहे.
दरम्यान, पाण्याने वेढलेले विठ्ठल मंदिर आजही मजबूत असून ते अजिबात ढसाळलेले नाही. गेल्या 47 वर्षांपासून या मंदिराला पाण्याने वेढले गेले असून यादरम्यान 15 वेळा ते पूर्णपणे खुले झाले आहे. हे मंदिर खुले झाल्यावर परिसरातील भाविक येथे दर्शनाला मोठी गर्दी करतात. त्यामुळे यंदाच्या गणेश उत्सवात हिडकल डॅममधील विठ्ठल मंदिराचा देखावा अयोध्यानगर (कडोली) येथील अक्षय मारुती बाळेकुंद्री या भक्ताने साकारला आहे. त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.


बेळगाव : बेळगावच्या गणेश उत्सवाला ऐतिहासिक परंपरा असून 1905 मध्ये पुण्यानंतर बेळगावात झेंडा चौक येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात करण्यात आली होती. तसेच लोकमान्य टिळक यांनी बेळगावला घेऊन गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर दरवर्षी शहरात मंडळांची संख्या वाढत गेली. त्यापैकी अनेक मंडळांना शंभराहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत तर काही मंडळांनी सुवर्ण महोत्सवी, रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले आहे. तर काही मंडळे अलिकडच्या काही वर्षांत स्थापन झाली आहेत.

belgaum Belgaum Ganeshotsav ganapati ganesh festival photo belgavkar बेळगाव belgaum Vitthal Temple in Raja Lakham Gowda Reservoir at Hidkal Hukkeri belgaum under water

belgaum Belgaum Ganeshotsav ganapati ganesh festival Vitthal Temple in Raja Lakham Gowda Reservoir at Hidkal Hukkeri belgaum under water

बेळगाव गणेशोत्सव : हिडकल डॅममधील विठ्ठल मंदिर झालयं दर्शनासाठी खूले;
बाप्पा समोर साकारलं 'विठ्ठल मंदिर' Video; बेळगावच्या गणेश उत्सवाला ऐतिहासिक परंपरा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm