बेळगाव : केएसआरटीसीची बस पलटी होऊन 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज सकाळी रामदुर्ग तालुक्यातील बिजगुप्पी गावात घडली. चिक्कोप्प गावातून रामदुर्गकडे एक बस जात होती. त्यात 50 हून अधिक प्रवासी होते. पाटा कापल्याने बस बिजगुप्पीजवळ रस्त्यालगत असलेल्या शेतातील झाडावर आदळल्याने बस पलटी झाल्याची माहिती आहे.
बसमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. घटनेनंतर तात्काळ 108 ला फोन करून जखमींना रामदुर्ग तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात कटकोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
उत्तर कर्नाटकात मोठ्या प्रमाणात जुन्या बसेस धावत असल्याने असे अपघात होत असतात. याचा शासनाने गांभीर्याने विचार करून नवीन बसेस ग्रामीण भागात सुरू कराव्यात, अशी मागणी जनतेने केली आहे.