मथुरेत EMU ट्रेनचा विचित्र अपघात; रुळावरून थेट प्लॅटफॉर्मवर चढली

मथुरेत EMU ट्रेनचा विचित्र अपघात;
रुळावरून थेट प्लॅटफॉर्मवर चढली

belgavkar.com | belgaum | belgavkar

सुदैवाची गोष्ट म्हणजे ट्रेनचे इंजिन प्लॅटफार्मवर येताच..

मथुरा : मथुरा जंक्शनवर रेल्वे अपघाताची दुर्घटना घडली. याठिकाणी शकूरबस्ती — नवी दिल्ली — मथुरा शटल ईएमयू ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाची गोष्ट म्हणजे ट्रेनचे इंजिन प्लॅटफार्मवर येताच प्लॅटफार्मवरील प्रवासी पळून गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी आधीच उतरले होते (Shakurbasti-Mathura MEMU (04446) Mathura Junction in Mathura, Uttar Pradesh).
मंगळवारी रात्री 10.55 च्या सुमारास लोको पायलट इंजिन बंद करून ते पार्क करत होते, तेव्हा काही कारणास्तव इंजिनचा वेग वाढला आणि ट्रेनने स्टॉपर तोडला आणि प्लॅटफॉर्मवर गेली. इंजिन प्लॅटफॉर्मवर चढताना पाहून प्लॅटफॉर्मवर बसलेले आणि उभे असलेले लोक पळून गेले, मात्र त्यांचे काही साहित्य रेल्वेच्या इंजिनखाली सापडल्याचे सांगण्यात येते.  या अपघातातील मोठी गोष्ट म्हणजे प्लॅटफॉर्मवर रेल्वे इंजिनच्या प्रवेशापासून काही अंतरावर ओएचई लाईनचा पोल लावण्यात आला होता, त्यामुळे ट्रेनचे इंजिन त्यावर आदळले आणि थांबले. जर ओएचई लाईनचा पोल नसता तर प्लॅटफॉर्मवर ट्रेन किती प्रमाणात धावली असती आणि किती लोकांना त्याचा फटका बसला असता याचा अंदाज लावता आला नसता. 
सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून रेल्वे अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि : श्वास सोडला असून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. स्टेशन डायरेक्टर एसके श्रीवास्तव यांनी सांगितले की, अपघाताची चौकशी करण्यात येत असून जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दुसरीकडे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची ओएचई लाइन खराब झाल्याने अनेक ट्रेनवरही परिणाम झाला आहे. जोपर्यंत लाईन पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत इतर प्लॅटफॉर्मवरून ट्रेन चालवल्या जात आहेत.

Shakurbasti Mathura MEMU breaks through platform at Mathura junction

Train Climbs Platform At UPs Mathura Railway Station No Casualties

मथुरेत EMU ट्रेनचा विचित्र अपघात; रुळावरून थेट प्लॅटफॉर्मवर चढली
सुदैवाची गोष्ट म्हणजे ट्रेनचे इंजिन प्लॅटफार्मवर येताच..

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm