बेळगाव : त्याचा मोबाईल आणि बॅग आढळली

बेळगाव : त्याचा मोबाईल आणि बॅग आढळली

belgavkar.com | belgaum | belgavkar

2 ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शोध

बेळगाव—खानापूर : यडोग्याजवळील मलप्रभा नदी पुलावरुन बेपत्ता झालेल्या संपतकुमार निंगाप्पा बडगेर (वय 24, रा. कोडचवाड, ता. खानापूर) या तरुणाचा तपास युद्धपातळीवर सुरु आहे. पोलिस, अग्रिशामक जवान व स्थानिकांनी मंगळवारी नदीपात्र व काठावरील शिवारे पालथी घातली. बंधाऱ्याचे पाणी अडविल्यानंतर नदीपात्रात त्याचा मोबाईल आणि बॅग आढळून आल्याने संभ्रम वाढला आहे. सकाळी दहापासून 2 ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने यडोगा, चापगाव नदीकाठावरील परिसरात शोध घेण्यात आला. यावेळी 400 हून अधिक स्थानिक तरुणांनीही शोध मोहिमेत सहभाग घेतला.
सोमवारी जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी लघुपाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून यडोगा बंधाऱ्याचे पाणी अडवण्याची सूचना केली होती. त्यानुसार सकाळपासून पाणी अडविण्यात आले. यामुळे पुलापासून 50 फूट अंतरावर नदीपात्रात संपतकुमारचा मोबाईल आढळून आला. काही वेळाने दोनशे फूट अंतरावर एक काळी बॅग आढळली. त्यात त्याची ओळखपत्रे व एक चिठ्ठी सापडली. पण, चिठ्ठी भिजल्याने त्यावरील मजकूर स्पष्ट कळणे कठीण झाले आहे.
बुधवारी बोटीने शोध : नदीत मोबाईल आणि बॅग सापडल्याने संपतकुमारचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे, पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बुधवारी दांडेलीतील रिव्हर राफ्टिंग पथक बोटीच्या साहाय्याने नदीपात्रात शोधमोहीम राबविणार आहे. अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख वेणुगोपाल, डीएसपी रवी नाईक, पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक, एस. सी. पाटील यांनी दिवसभर शोध मोहिमेत सहभाग घेतला.

belgaum Malprabha river near Yadoga bridge investigation of youth from Kodachwad Khanapur missing belgavkar बेळगाव belgaum

belgaum youth from Kodachwad Khanapur missing Malprabha river near Yadoga bridge

बेळगाव : त्याचा मोबाईल आणि बॅग आढळली
2 ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शोध

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm