ISKCON च्या गोशाळेतील गायींवरुन यांचा मोठा आरोप

ISKCON च्या गोशाळेतील गायींवरुन यांचा मोठा आरोप

belgavkar.com | belgaum | belgavkar

भाजपा खासदार मेनका गांधी यांनी

गोशाळेतून गायी खाटिकांना विकल्या जातात Video

भाजपा खासदार मेनका गांधी यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (ISKCON) वर गंभीर आरोप केलाय. त्यांनी इस्कॉनची संपूर्ण संस्थाच फसवणूक करणारी असल्याच म्हटलं आहे. इस्कॉन आपल्या गोशाळेतून गायींची खाटिकांना विक्री करते, असा गंभीर आरोप मेनका गांधी यांनी केला. इस्कॉनने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलय. आमच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याच इस्कॉनने म्हटलं आहे. खासदार मेनका गांधी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं.
माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी या व्हिडिओमधून International Society for Krishna Consciousness (ISKCON) वर आरोप केले आहेत. गोशाळा बनवण्यासाठी ते सरकारकडून जमीन घेतात. त्यानंतर त्याचा फायदा उचलतात असं मेनका गांधी म्हणाल्या. खासदार असण्याबरोबर मेनका गांधी प्राण्यांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या सुद्धा आहेत.
मेनका गांधी यांनी इस्कॉन संबंधीचा आपला अनुभव सुद्धा शेअर केलाय. “मी अलीकडेच आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील गोशाळेत गेली होते. इस्कॉनकडून या गोशाळेच संचालन केलं जातं. तिथे गायींचा अवस्था खूपच खराब होती. गोशाळेत एकही बछडा नव्हता. याचा अर्थ ते गायी विकून टाकतात” असा आरोप मेनका गांधी यांनी केला. ISKCON कडून या गायी खाटिकांना विकल्या जातात. ते त्यांना मारुन टाकतात. मेनका गांधी यांचा हा व्हिडिओ एका महिन्यापूर्वीचा असल्याच म्हटल जातय.

Maneka Gandhi accuses ISKON of selling cows to butchers; temple body reacts

BJPs Maneka Gandhi says ISKCON biggest cheat sells cows to butchers

ISKCON च्या गोशाळेतील गायींवरुन यांचा मोठा आरोप
भाजपा खासदार मेनका गांधी यांनी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm