पार्टीत पोटभर जेवल्यानंतर अचानक पोटात दुखू लागलं, जीव वाचवण्यासाठी काढावं लागलं आतडं

पार्टीत पोटभर जेवल्यानंतर अचानक पोटात दुखू लागलं, जीव वाचवण्यासाठी काढावं लागलं आतडं

belgavkar.com | belgaum | belgavkar

कारण ऐकून हादरालं... तर त्याला फक्त हँगओव्हर समजू नका....

आजची यूथ जनरेशन एंजॉयमेंटकडे जास्त लक्ष देते. यांच्यासाठी सतत पार्टी करणे खूपच नॉर्मल झाले आहे. पार्ट्यांमध्ये भरपूर दारू आणि अनहेल्दी पदार्थ पोटात जातात. यामुळेच पार्टीत जेवढी मजा असते, त्याच्या दुप्पट समस्यांना दुसऱ्या दिवशी सामोरे जावे लागते. पार्टीनंतरचा दिवस हँगओव्हरमधून सावरण्यात घालवला जातो. हँगओव्हरमुळे डोकेदुखी, पोटदुखी, उलट्या होऊ शकतात. अनेकांना यात काय नवीन असे वाटू शकते. पण मंडळी आज आम्ही तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहोत ज्यामुळे सतत पार्टी केल्याने आलेल्या आरोग्य समस्यांनंतर एका 19 वर्षांच्या मुलीचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तिला हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागल्या आणि शेवटी तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तिची अर्धे आतडे कापून काढावे लागले.
2019 मध्ये, उत्तर आयर्लंडमध्ये राहणार्‍या 19 वर्षीय अंबर ऑरने जोरदार पार्टी केली (Amber Orr, from Ballymena, Northern Ireland). दुसऱ्या दिवशी तिला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीला अंबरला वाटले की हा हँगओव्हर आहे, पण हळूहळू तिला समजू लागले की ही एका मोठ्या संकटाची सुरुवात आहे. दोन दिवस उलटूनही मुलीच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिच्या आईने तिला अँट्रिम एरिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जिथे डॉक्टरांनी रात्रभर अंबरचे निरीक्षण केले. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे तिच्या पोटाच्या खालच्या भागात दुखत असल्याचे डॉक्टरांना वाटले. मात्र 48 तासांनंतर एका नव्या खुलाशाने सर्वांनाच धक्का दिला.
सर्जरी करून काढावे लागले अपेंडिक्स : 48 तास रुग्णालयात राहिल्यानंतर डॉक्टरांनी अंबरचे अपेंडिक्स फुटल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. या समस्येला अपेन्डिसाइटिस (Appendicitis) म्हणतात, ज्यामध्ये बोटाच्या आकाराचे अपेंडिक्स काढावे लागते. या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी तिच्या काही चाचण्या केल्या आणि त्यानंतर तिला घरी पाठवले (cancerous neuroendocrine mass – a rare tumour).
तपासणीत दिसून आला आतड्यांचा कॅन्सर
अंबरची तब्येत बरी होत असल्याचे जाणवताच तपासणी अहवाल आला. ज्यामध्ये आतड्यात घातक कर्करोग आढळून आला. याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर म्हणतात, जो दुर्मिळ आहे आणि कोणत्याही अवयवामध्ये उद्भवू शकतो. हे तिच्या अपेंडिक्सपासून सुरू झाले आणि नंतर आतड्यांपर्यंत पसरले. त्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे आतडे अर्धे काढून टाकण्यात आले आणि केमोथेरपीद्वारे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यात आल्या. आता अंबर 4 वर्षांपासून या कॅन्सरपासून मुक्त आहे.
कॅन्सरची लक्षणे
कॅन्सर रिसर्च यूके नुसार, जेव्हा कॅन्सरच्या गाठी आतड्यात पसरतात तेव्हा खालील लक्षणे दिसू लागतात. पोट साफ होत नाही
जुलाब
पोटदुखी
गुद्द्द्वारामधून रक्त येणे
अचानक वजन कमी होणे इत्यादी
कॅन्सरमध्ये असा असावा आहार
कॅन्सर रिसर्च यूकेने सांगितले की, न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरच्या रुग्णाचा आहार उपचारात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच्यामध्ये कर्करोगाची कोणती लक्षणे दिसतात यावरही रुग्णाचा आहार अवलंबून असतो. जसे- जुलाब झाल्यास पाण्यासोबत पांढरा भात, पांढरा पास्ता, चांगली शिजवलेली अंडी आणि पांढरे ब्रेड खाऊ शकतो.
वजन कमी झाल्यास किंवा भूक कमी झाल्यास, दर 2 तासांनी थोडेसे जेवण घ्या.
तुमच्या आहारात प्रथिने आणि पूर्ण चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करा.
तुम्हाला उलट्या किंवा मळमळ होत असल्यास थोडेसे जेवण घ्या.
हलके अन्न खा आणि खारट आणि तेलकट पदार्थ टाळा.

After Party The 19 Year Old Girl Was Diagnosed With Bowel Cancer She Lost Her Appendix And Intestine In Surgery

Colon cancer Symptoms and causes : change in bowel habits frequent diarrhea or constipation Rectal bleeding or blood in the stool

पार्टीत पोटभर जेवल्यानंतर अचानक पोटात दुखू लागलं, जीव वाचवण्यासाठी काढावं लागलं आतडं
कारण ऐकून हादरालं... तर त्याला फक्त हँगओव्हर समजू नका....

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm