बेळगाव : 30 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार

belgavkar.com | belgaum | belgavkar

प्रकरणाचा संबंध व्हीटीयूशी

बेळगाव—belgavkar : बेळगाव येथील प्रतिष्ठीत विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या (व्हीटीयू) ज्ञानसंगम कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना आहार पुरवठा करणाऱ्या मेसच्या चालकाला 3 जणांनी 30 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. बी. सच्चिदानंद शेट्टी असे चालकाचे नाव असून याप्रकरणाची नोंद मंगळूरच्या सेन पोलिस ठाण्यात झाली आहे.
व्हीटीयूच्या ज्ञानसंगम कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना 2022 मध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या वर्षभरात आहार पुरवठा करण्याचा ठेका बी. सच्चिदानंद शेट्टी यांनी घेतला होता. श्री. शेट्टी यांनी या कामाची जबाबदारी व्यवस्थापकाकडे सोपविली होती. व्यवस्थापकाने मदतीसाठी अकाउंट व सहाय्यकाची नेमणूक केली होती. विद्यार्थ्यांकडून आहाराचे बिल मिळवावे, अशी विद्यापीठाने सूचना केल्यानंतर व्यवस्थापक, अकौन्टट व सहाय्यकाने मंजूर बिल मेस चालक शेट्टी यांच्या बँक खात्यावर जमा न करता स्वतःच्या खात्यावर जमा करून घेतले. याशिवाय मेसमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे वेतन दिले नाही. मेसचालकच्या संस्थेच्या नावे आहार साहित्य खरेदी करून बिल अदा न करता उधारी ठेवले आहे. शेट्टी यांना हे कळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

belgaum fraud 30 lakhs mess supplies food to the students Visvesvaraya Technical University VTU campus in Belgaum belgavkar बेळगाव belgaum

belgaum Visvesvaraya Technical University VTU campus in Belgaum

बेळगाव : 30 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार
प्रकरणाचा संबंध व्हीटीयूशी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm