बेळगाव : विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा...!
शाळांना दसरा सुट्टी कधीपासून?

belgavkar.com | belgaum | belgavkar

सलग तिसऱ्या वर्षी दसरा सुट्टीत कपात

बेळगाव—belgavkar : शालेय विद्यार्थी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतात ती गोष्ट याच महिन्यात आहे. दसरा सुट्टीला सोमवार (ता. 9 ऑक्टोबर) पासून सुरुवात होणार आहे, तर सहामाही परीक्षेची सांगता शनिवारी होणार आहे. सलग तिसऱ्या वर्षी दसरा सुट्टीत कपात करण्यात आली असून, 24 ऑक्टोबरला दसरा सुट्टी संपणार आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यापासून अभ्यासात गुंतलेल्या विद्यार्थ्यांना थोडासा विरंगुळा मिळणार आहे.
यावेळी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यापासून कोणतीही अडचण निर्माण झालेली नाही. त्यामुळे प्रथम सत्रातील अभ्यासक्रम पूर्ण झाल्याची माहिती अनेक शाळांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या सहामाही परीक्षेची सांगता झाल्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

belgaum Dussehra holidays for schools october belgavkar dasara बेळगाव School Holidays

belgaum Dussehra holidays for schools dasara School Holidays

बेळगाव : विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा...! शाळांना दसरा सुट्टी कधीपासून?
सलग तिसऱ्या वर्षी दसरा सुट्टीत कपात

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm