बेळगाव : 'ACB' च्या नावे धमकी दिल्यास कडक कारवाई; एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन

बेळगाव : 'ACB' च्या नावे धमकी दिल्यास कडक कारवाई;
एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : एसीबी अधिकारी आहे, असे सांगून कोणी पैशासाठी धमकावत असेल, तर अशा अनोळखी व्यक्तींबाबत तक्रार करा. त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई केली जाईल, असे आवाहन एसीबीचे (ACB -Anti Corruption Bureau - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) जिल्हा पोलिस प्रमुख बी. एस. न्यामगौड यांनी पत्रकाद्वारे केले आहे. बैलहोंगल येथील सहायक कृषी अधिकाऱ्याला असा फोन करून 5 लाखांची मागणी झाली. त्यांनी तक्रार केल्याने दोघे तोतया एसीबी अधिकारी जाळ्यात सापडले. या घटनेमुळे जनतेत जागृतीसाठी एसीबीने पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, एसीबी जर कोणावर छापा टाकणार असेल, तर त्याबाबत आधी कोणालाही कल्पना देत नाही. एखाद्या प्रकरणाची सखोल तपासणी होऊन नंतरच कायदेशीररित्या कार्यवाही होते. त्यामुळे अशी कोणाकडून धमकी येत असेल, तर त्यांनी एसीबीकडे लेखी तक्रार करावी.
5 लाखांची सेटलमेंटसाठी मागणी; दोघांना अटक
एसीबी अधिकारी असल्याचे सांगून धमकी देणार्या व 5 लाख रुपयांची मागणी करणार्या दोन खिलाड्यांना बैंलहोंगल पोलिसांनी अटक केले आहे. त्या दोघांनी बैंलहोंगल येथील कृषी अधिकार्याला फोन केला आणि मी एसीबी अधिकारी बोलतो, आपण बेळगावमध्ये बरीच प्रॉपर्टी केली आहे. उद्या ही मोठी समस्या होईल. त्यामुळे सेटलमेंट करूया म्हणून 5 लाख रुपयांची मागणी केली होती. सीपीआय युएच सातेनहळ्ळी यांनी आरोपींचा शोध घेत तालुक्यातील देशनूर गावच्या विशाल भावेप्पा पाटील आणि बेंगळूर येथील कोडगेहळ्ळी सहकारनगरच्या श्रीनिवास अश्वत्थनारायण यांना पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्याकडून धमकीसाठी वापरण्यात आलेला मोबाईल फोन व एक कारगाडी जप्त केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 'ACB' च्या नावे धमकी दिल्यास कडक कारवाई; एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm