महाराष्ट्र : नवरात्रीत दांडिया कार्यक्रम नियमावली जाहीर;

महाराष्ट्र : नवरात्रीत दांडिया कार्यक्रम नियमावली जाहीर;

belgavkar.com | belgaum | belgavkar

'या' गोष्टी असणार बंधनकारक

महाराष्ट्र : नवरात्रीत रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. दांडियामध्ये सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी आयोजकांना घ्यावी लागणार आहे. मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात रास दांडियाचे आयोजन करण्यात येते. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
राज्यात नवरात्रीच्या 9 दिवसात दांडियाचे आयोजन करण्यात येते. अनेकदा राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अशाप्रकारचे आयोजन करण्यात येते. आयोजकांच्या वतीने अनेकदा प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरीही काही आयोजक त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दांडियाचे आयोजन करताना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाचा जागी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका ठेवणे आयोजकांना बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
रास दांडिया खेळताना अनेकदा लोकं भान विसरून नाचतात, अशावेळी काही वेळा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. तसेच कोरोना कालखंडानंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे देखील अनेक अहवालातून समोर आले. त्यामुळे अनेक जीवनशैली विकार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणतीही वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उदभवल्यास त्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असते. यामुळे एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. 

maharashtrarules announced for organizers of dandiya program during navratri these things are mandatory

dandiya program during navratri

महाराष्ट्र : नवरात्रीत दांडिया कार्यक्रम नियमावली जाहीर;
'या' गोष्टी असणार बंधनकारक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm