मराठा आंदोलकांनी मुंबई-बंगळुरू महामार्ग रोखला; 10-15 किमी वाहनांच्या रांगा

मराठा आंदोलकांनी मुंबई-बंगळुरू महामार्ग रोखला;
10-15 किमी वाहनांच्या रांगा

belgavkar.com | belgaum | belgavkar

एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही

पुणे : मराठा आरक्षणाला पुण्यात चांगला पाठिंबा मिळत असून, आज पुण्यातील नवले ब्रीजजवळ महामार्गावर टायर जाळण्यात आला. त्यामुळे तिथे काहीवेळ तणावाचे वातावरण होते. तिथे एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच शहरात बावधनमध्ये बंद पुकारण्यात आला असून, ठिकठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालनाच्या अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये साखळी उपोषण केले जात असून, कँडल मार्च देखील काढले जात आहेत. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जाळपोळ झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याने त्यावर जरांगे पाटील यांनी सर्वांनी शांत राहावे असे आवाहन केले आहे. जांभुळवाडी गावामध्ये देखील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातही साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कोंढवा भागातील मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा व लाक्षणिक उपोषण आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू केले आहे. नरवीर तानाजी मालुसरे चौक, कोंढवा खुर्द येथे हे उपोषण होत आहे. दि मुस्लिम फांउडेशन, कोंढवा खुर्द, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा आणि माजी नगरसेवक ॲड. हाजी गफुर पठाण यांनी हे उपोषण सुरू केले आहे. सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता मशाल मोर्चा आयोजिल आहे. हा मोर्चा अहिरे गेट ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, न्यू कोपरे येथून सुरू होईल.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शहरातील वकिलांनी भव्य मशाल मोर्चा आयोजिला आहे. हा मोर्चा 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (एसएसपीएमएस कॉलेज) येथून सुरू होणार आहे. शिवाजी पुतळा ते महाराणी जिजाऊ पुतळा लाल महाल येथपर्यंत हा मोर्चा असणार आहे.

Maratha agitation : Pune Bangalore highway blocked tyres burnt

Pune Navle Bridge shut down amidst Maratha reservation protest

Traffic on the Pune Bangalore highway in Pune’s Navale Bridge

demand for Maratha reservation

मराठा आंदोलकांनी मुंबई-बंगळुरू महामार्ग रोखला; 10-15 किमी वाहनांच्या रांगा
एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm