ओडिशाच्या भितरकनिका राष्ट्रीय उद्यानातील औषधी वनस्पती चोरीला गेल्याने 4 जणांना अटक करण्यात आले आहे. असं काय होतं या वनस्पतीमध्ये, हे प्रकरण नक्की काय आहे हे जाणून घेऊयात (Bhitarkanika National Park in Odisha @Kendrapara District).
ज्या वनस्पतीच्या मुळांमुळे हे चार जा तुरुंगात गेले ती वनस्पती (roots and stems of the endangered Salacia mangrove species) ही केवळ त्याच्या औषधी गुणधर्मांसाठीच नाही तर पर्यावरण रक्षणासाठीही महत्त्वपूर्ण आहे. चला या वनस्पतीची मुळे चोरण्याच्या धक्कादायक प्रकरणाबद्दल जाणून घेऊयात.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
भितरकनिका राष्ट्रीय उद्यानातील कालीभंजडिहा जंगलात रविवारी वनविभागाच्या गस्ती घालणाऱ्या पथकाने चार जणांना चोरी करताना रंगेहात पकडले. हे लोक सलासिया या महत्त्वाच्या खारफुटीच्या प्रजातीची मुळे आणि देठ जंगलातून तोडून नेत होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीचे साहित्य जप्त केले आहे.
काय आहे वनस्पतीची खासियत? ' सलासियाला स्थानिक भाषेत बटारा / Batara असे म्हणतात. बटारा ही एक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती मधुमेह आणि रक्तातील साखरेच्या उपचारांमध्ये वापरले जाते. असे घटक या वनस्पतीच्या मुळांमध्ये आढळतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळेच त्याची मागणी वाढत असून बेकायदेशीरपणे ही वनस्पती कापण्याच्या घटना समोर येत आहेत.
या राष्ट्रीय उद्यानातील खारफुटीची जंगले पर्यावरण संतुलन राखण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ही खारफुटीची जंगले नैसर्गिक आपत्तींपासून किनारी भागाचे संरक्षण करतात. याशिवाय जैवविविधतेचेही रक्षण करतात. अशा परिस्थितीत खारफुटीची झाडे तोडणे पर्यावरणासाठी मोठा धोका ठरू शकतो. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आरक्षित वनक्षेत्रातील बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याचा आरोप आहे. भारतीय वन कायद्यांतर्गत या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. जंगल आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वनविभागाने स्थानिक रहिवाशांनी जंगलांच्या रक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, बेकायदेशीर कृत्यांची माहिती तातडीने अधिकाऱ्यांना द्यावी. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून त्यासाठी जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. Locally known as Batara, Salacia is a critically important medicinal plant, widely valued for its applicability in managing diabetes and blood sugar levels. Alarmingly, the plant's dry roots are being illegally sold as counterfeit sandalwood due to their yellow hue, a forest officer revealed.
