Nita Ambani wows in 200-year-old parrot pendant with a Kanchipuram saree at Donald Trump’s private dinner : वाॉशिंग्टन डीसी : आज डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump's oath-taking) अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) हे देखील अमेरिकेत दाखल झाले आहेत. या सोहळ्या दरम्यान आयोजित एका समारंभात मुकेश आणि निता अंबानी उपस्थित होते. यावेळी निता अंबानी यांनी आपल्या साडीतून भारतीय हातमागाच्या समृद्ध संस्कृतीचं प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर केल्याचे पाहायला मिळाले.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
निता अंबानी यांनी कांचिपुरम (कांची / कांजीवरम @तामिळनाडु) साडी नेसली होती. भारतातल्या कांचिपुरम मधल्या विविध 100 मंदिरातील प्रतिकृती त्यांचा या साडीवर विणल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कारागीर बी.कृष्णमूर्ती यांनी ही साडी तयार केली आहे. या साडीत इरुथलाई पक्षी (भगवान विष्णूचे प्रतीक असलेले दुहेरी डोके असलेले गरुड), मयिल (देवत्व आणि अमरत्वाचे प्रतीक) आणि सोरगावसल म्हणजेच भारताच्या लोककथेचा उत्सव साजरा करणारे काही मोटीव्हज् पहायला मिळत आहेत.
या साडीला कन्टेम्पररी लूक देण्यासाठी, नीता अंबानी यांनी या कांचीपुरम साडीवर वेलवेटचा ब्लाऊज परिधान केला आहे, ज्याच्या गळ्याला आणि हाताला बिड्सचं वर्क केलेलं पहायला मिळतयं. हा ब्लाऊज डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलं आहे.
निता अंबानींच्या या पेहरावातील एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गळ्यात घातलेलं पेंडट. हे पेंडंट तब्बल 200 वर्षे जुनं आहे. पोपटाच्या आकाराचं हे पेंडंट पाचू, रुबी आणि मोती जडीत आहे. नीता अंबानींनी या सोहळ्याला भारतीय परंपरा, कलाकुसर आणि संस्कृतीचं जागतिक पातळीवर घडललेलं दर्शन सगळ्यांचचं लक्ष वेधून घेत आहे.
