याठिकाणी Facebook अन् Instagram वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे;

याठिकाणी Facebook अन् Instagram वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे;

belgavkar.com | belgaum | belgavkar

आता किती खर्च करावा लागेल?

सोशल मीडिया यूजर्सच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत, कारण बहुतांश सोशल मीडिया कंपन्या एकामागून एक सबस्क्रिप्शन मॉडेल्स लाँच करत आहेत. त्यामुळेच सोशल मीडिया वापरण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. आता या यादीत मेटा मालकीच्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामची नावे जोडली गेली आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी सबस्क्रिप्शन शुल्क मेटाने जाहीर केले आहे.
शुल्क आकारण्यामागे कारण काय?
आत्तापर्यंत मेटा आपल्या वापरकर्त्यांचा डेटा वापरत होता. परंतु युरोपियन नियमांच्या नवीन डेटा गोपनीयता कायद्यानंतर मेटाने डेटा ऍक्सेस न करण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये युजर्सना कोणतीही जाहिरात मेटाकडून देण्यात येणार नाही. मेटा सबस्क्रिप्शन शुल्क 18 वर्षे आणि त्यावरील वयोगटासाठी आहे (Meta unveils premium ad-free plans for Facebook and Instagram in Europe).
किती शुल्क आकारले जाईल?
युरोपियन युनियन आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांसाठी मेटा चार्ज लागू करण्यात आला आहे. सध्या हे शुल्क युरोपीय देशांसाठी आहे, मात्र येत्या काही दिवसांत ते भारतासह इतर देशांमध्येही लागू होण्याची शक्यता आहे. मेटा मालकीचे सदस्यत्व शुल्क आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबर 2023 पासून लागू करण्यात आले आहे. मेटाच्या वेब सेवेसाठी, दरमहा 9.99 युरो (सुमारे 880 रुपये) द्यावे लागतील. तसेच, iOS आणि Android वापरकर्त्यांना 12.99 युरो (सुमारे 1,100 रुपये) द्यावे लागतील, जे X प्लॅटफॉर्मच्या सदस्यता खर्चापेक्षाही खूप जास्त आहे.

Facebook and Instagram to Offer Subscription for No Ads in Europe

Meta unveils premium ad free plans for Facebook and Instagram in Europe

Facebook and Instagram launch paid ad free subscription

Instagram and Facebook : ad free paid subscription

याठिकाणी Facebook अन् Instagram वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे;
आता किती खर्च करावा लागेल?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm