WhatsApp : ‘या’ वापरकर्त्यांसाठी खुशखबर...!

WhatsApp : ‘या’ वापरकर्त्यांसाठी खुशखबर...!

belgavkar.com | belgaum | belgavkar

WhatsApp group calls on iOS;
एकाच वेळी 31 लोकांना करता येणार ग्रुप कॉलिंग

व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी व्हिडीओ, व्हॉइस कॉलद्वारे संवाद साधू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅप आपल्या iOS व अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी सतत नवीन फीचर्स लॉन्च करत असते. व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी ही मेटा आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर आणणार आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना 31 जणांशी एकाच वेळी व्हिडीओ कॉल करता येणार आहे. WABetaInfo या वेबसाइटच्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच अ‍ॅप स्टोअरवर iOS 23.21.72 अपडेट आणले आहे.
मेटाच्या मालकीचे असलेले इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड आणि iOS वापरकर्त्यांना केवळ 15 लोकांपर्यंत ग्रुप कॉलिंग करण्याची परवानगी देत होते. मागील अपडेटमध्ये ग्रुप कॉलिंगसाठी 32 जणांना सहभागी होता येत होते. मात्र वापरकर्त्यांना सुरुवातीला असे कॉल सुरु करताना केवळ 15 जणांना सहभागी करून घेता येत होते.
आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉल कसा सुरु करावा?
1. सर्वात पहिल्यांदा तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप उघडावे.
2. त्यानंतर स्क्रीनखाली कॉल्स टॅब वर क्लिक करावे.
3. स्क्रीनच्या वरील भागात उजव्या भागात असलेल्या नवीन कॉल बटणावर क्लिक करावे.
4. त्यानंतर न्यू ग्रुप कॉल असा पर्याय तुम्हाला दिसेल.
5. तुम्हाला तिथे एक कॉन्टॅक्ट लिस्ट दिसेल.
6. त्यामधील ज्यांना तुम्हाला कॉलमध्ये जोडून घ्यायचे आहे त्यांच्या नावावर क्लिक करावे.
7. ज्यांना ग्रुप कॉलमध्ये जोडायचे आहे त्यांना जोडल्यानंतर कॉल सुरु करण्यासाठी व्हॉइस बटणावर क्लिक करावे.

नवीन अपडेटसह व्हॉट्सअ‍ॅप आता iOS वापरकर्त्यांना एकाच वेळी 31 लोकांसह ग्रुप कॉल करता येणार आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना कॉलिंगचा चांगला अनुभव प्राप्त होणार आहे.

How iPhone users can now enjoy 31 person group calls on WhatsApp

WhatsApp now allows iPhones users to start group call with up to 31 contacts here is how

WhatsApp : large group calls on iOS

WhatsApp group calls with up to 31 participants

WhatsApp : ‘या’ वापरकर्त्यांसाठी खुशखबर...!
WhatsApp group calls on iOS; एकाच वेळी 31 लोकांना करता येणार ग्रुप कॉलिंग

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm